शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

नागपूर मनपाचा अर्थसंकल्प पुन्हा लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 11:37 PM

महापालिकेचा २०१८-१९ या वर्षाचा अर्थसंकल्प १५ मे पर्यंत सादर करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र अजूनही अर्थसंकल्प तयार करण्याचे काम सुरू आहे. अर्थसंकल्पात महापालिकेतील पदाधिकारी, आमदार, स्थायी समितीचे सदस्य व नगरसेवक, अधिकारी आदींची छायाचित्रे असतात. अद्याप फोटो संकलनाला सुरुवात झालेली नाही. याचा विचार करता जूनच्या १५ तारखेपर्यंत अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता नसल्याची माहिती महापालिके च्या अधिकाऱ्यांनी दिली.

ठळक मुद्देजूनच्या सर्वसाधारण सभेत सादर होण्याची शक्यता : अद्याप फोटो संकलनाला सुरुवात नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: महापालिकेचा २०१८-१९ या वर्षाचा अर्थसंकल्प १५ मे पर्यंत सादर करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र अजूनही अर्थसंकल्प तयार करण्याचे काम सुरू आहे. अर्थसंकल्पात महापालिकेतील पदाधिकारी, आमदार, स्थायी समितीचे सदस्य व नगरसेवक, अधिकारी आदींची छायाचित्रे असतात. अद्याप फोटो संकलनाला सुरुवात झालेली नाही. याचा विचार करता जूनच्या १५ तारखेपर्यंत अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता नसल्याची माहिती महापालिके च्या अधिकाऱ्यांनी दिली.अर्थसंकल्पीय तरतुदीसाठी स्थायी समितीने विविध विभागांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. काही विभागाकडून उशिराने प्रस्ताव प्राप्त झाले. शहरात सुरू असलेले विकास प्रकल्प विचारात घेता मागील काही वर्षापासून सुरू असलेल्या वाढीव रकमेचा अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा याहीवर्षी कायम राहणार आहे. परंतु उत्पन्नाच्या मर्यादित साधनांचा विचार करता प्रस्तावित अर्थसंकल्पात अपेक्षित उत्पन्नाचा आकडा गाठण्याची शक्यता कमीच आहे.स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जाधव यांनी २०१७-१८ या वर्षाचा २२७१.९७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. मात्र मार्च २०१८ अखेरीस महापालिकेच्या तिजोरीत १७०० कोटींचा महसूल जमा झाला. यात शासकीय अनुदानाचा मोठा वाटा आहे. अपेक्षित उत्पन्न व प्रत्यक्ष उत्पन्न यात जवळपास ५५० कोटींची तफावत आहे. वित्त वर्षात शासनाकडे अनुदान प्रलंबित नसल्याने अर्थसंकल्पात शासकीय अनुदानाचा वाटा घटण्याची शक्यता आहे. असे असूनही असूनही प्रस्तावित अर्थसंकल्प २५०० कोटीहून अधिक राहणार असल्याची माहिती आहे.महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता करापासून गेल्या वर्षात ३९२.९१ कोटी अपेक्षित होते. प्रत्यक्षात २१० कोटीची कर वसुली झाली.पुढील वर्षात ५५० कोटी अपेक्षित राहणार आहे. गेल्या वर्षात पाणीपट्टीतून १७० कोटी अपेक्षित होते. प्रत्यक्षात १३५ कोटी जमा झाले. पुढील वर्षात २५० कोटींची अपेक्षा आहे. नगररचना विभागाकडून १०१ कोटी अपेक्षित असताना ६० कोटी जमा झाले. पुढील वर्षात १५० कोटींची अपेक्षा आहे. शासनाकडून मागील काही वर्षापासून प्रलंबित असलेले १४९ कोटींचे अनुदान व शिक्षण विभाग व मलेरिया-फायलेरिया विभागाचे ५०.६२ कोटी मिळाल्याने महापालिकेला थोडा दिलासा मिळाला. वित्त वर्षात ही रक्कम मिळणार नसल्याने कर वसुलीवर प्रशासनाला लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.सायबरटेचा घोळ सुरूचएलबीटी बंद झाल्याने मालमत्ता कर हाच महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत आहे. या विभागाच्या उत्पन्नात वाढ व्हावी, यासाठी मालमत्तांचा सर्वे हाती घेण्यात आला. सायबरटेक कंपनीने चुकीचा सर्वे केल्याने मालमत्ता कराच्या वसुलीवर परिणाम झाला. वर्षभरात सर्वे पूर्ण करणे अपेक्षित होते. परंतु अजूनही सर्वेचे काम अर्धवट आहे. जानेवारीपासून काही महिने सर्वेक्षण बंद होते. अजूनही या कामाला गती आलेली नाही. सर्वेक्षणाचा घोळ सुरू असूनही पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात मालमत्ताकरापासून ५५० कोटींचा महसूल अपेक्षित आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBudgetअर्थसंकल्प