शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

नागपूर मनपाचा जैविक कचराही उघड्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रुग्णालयातील जैविक कचऱ्याचे (बायोमेडिकल वेस्ट) योग्य नियोजन न झाल्यास तो घातक ठरू शकतो. परंतु या कचऱ्याची योग्यपद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी असलेल्या महानगरपालिकेलाच याचा विसर पडल्याचे चित्र आहे. मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयाच्या परिसरातच रुग्णांसाठी वापरलेले ग्लोव्हज, मास्क, इंजेक्शनच्या कचऱ्याचा ढीग लावला जातो. विशेष म्हणजे, ‘बायोमेडिकल वेस्ट’च्या व्यवस्थापनेला ...

ठळक मुद्देइंदिरा गांधी रुग्णालय : राज्यमंत्र्यांच्या सूचनांकडेही दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रुग्णालयातील जैविक कचऱ्याचे (बायोमेडिकल वेस्ट) योग्य नियोजन न झाल्यास तो घातक ठरू शकतो. परंतु या कचऱ्याची योग्यपद्धतीने विल्हेवाट लावण्याची जबाबदारी असलेल्या महानगरपालिकेलाच याचा विसर पडल्याचे चित्र आहे. मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालयाच्या परिसरातच रुग्णांसाठी वापरलेले ग्लोव्हज, मास्क, इंजेक्शनच्या कचऱ्याचा ढीग लावला जातो. विशेष म्हणजे, ‘बायोमेडिकल वेस्ट’च्या व्यवस्थापनेला घेऊन मुख्यमंत्र्याच्या सूचनेवरून नुकतेच वैद्यकीय शिक्षण राज्यंमत्री रवींद्र चव्हाण यांनी मेयो, मेडिकलसह मनपाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केली. परंतु त्यानंतरही मनपाचे रुग्णालय सुधारत नसल्याचे दिसून येत आहे.जैविक कचऱ्याचे (बायोमेडिकल वेस्ट) संकलन, वर्गीकरण, प्रक्रिया, उपचार व विल्हेवाट यांचे व्यवस्थापन मानव व पर्यावरणासाठी निकोप होण्याच्या दृष्टीने ‘बायो मेडिकल वेस्ट हॅण्डलिंग रुल्स’चे पालन होणे आवश्यक असते. यासाठी महानगरपालिकेने सर्व रुग्णालयांमधून बायोमेडिकल वेस्ट उचलण्याचे कंत्राट एका खासगी कंपनीला दिले आहे. ही कंपनी प्रत्येक खाटामागे विशिष्ट शुल्क आकारून रुग्णालयातील ‘बायोमेडिकल वेस्ट’ उचलते. परंतु मनपाचे रुग्णालय असलेल्या इंदिरा गांधी रुग्णालय मात्र या कचऱ्याचा व्यवस्थापनेला घेऊन फारसे गंभीर नाही. उपचारांच्या सोर्इंना घेऊनही येथे उदासीनता असल्याने केवळ ७५ खाटा असलेल्या रुग्णालयातही बहुसंख्य खाटा रिकाम्याच असतात. लाखो रुपये खर्च होत असलेल्या या इस्पितळात अद्ययावत सोर्इंच्या नावाने बोंब असताना कमी रुग्ण असूनही रुग्णालयाच्या जैविक कचऱ्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सुत्रानुसार, रुग्णालयाचा कारभार प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रमाणपत्राविनाच सुरू आहे.विशेष म्हणजे, मेयो, मेडिकलमधीलही जैविक कचऱ्याचा अव्यवस्थापनेवर‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताला घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित झाला. याची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना नागपुरातील बायोमेडिकल वेस्टचा आढावा घेण्याची सूचना केली. त्यानुसार ८ एप्रिल रोजी राज्यमंत्री चव्हाण यांनी मेयोमध्ये बैठक घेतली. जैविक कचऱ्याच्या व्यवस्थापनेला घेऊन अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. एवढेच नव्हे तर जैविक कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन न झाल्यास रुग्णालय प्रशासनातील संबंधिक अधिकारी व महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही चव्हाण यांनी दिला होता. यावेळी महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) प्रदीप दासरवार व वैद्यकीय अधिकारी (रुग्णालय) डॉ. अनिल चिव्हाणे उपस्थित होते. परंतु त्यानंतरही जैविक कचऱ्या विषयीची उदासीनता कायम आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका