शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर पावसाळी अधिवेशन; खासगी टॅक्सी कंपनीवर कृपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 10:53 IST

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन यावेळी ४ जुलैपासून नागपुरात होत आहे. अधिवेशनासाठी येणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी खासगी टॅक्सी कंपनीकडून सेवा घेतली जाणार आहे.

ठळक मुद्दे२०० गाड्या लागणार दररोज ३ लाखांचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन यावेळी ४ जुलैपासून नागपुरात होत आहे. अधिवेशनासाठी येणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी खासगी टॅक्सी कंपनीकडून सेवा घेतली जाणार आहे. अधिकाऱ्यांच्या पदानुसार प्रशासन त्यांच्यासाठी लहान-मोठ्या २०० गाड्यांची व्यवस्था करण्याच्या कामी लागले आहे. एका लहान कारवर दररोज १२०० रुपये खर्च येईल. एकूणच टॅक्सी सेवेवर दररोज सुमारे ३ लाखांचा खर्च होणार आहे.प्रशासनाचे म्हणणे आहे की, गेल्या हिवाळी अधिवेशनात १०५५ वाहन नागपूर, अमरावती, औरंगाबाद व नाशिक विभागातून विविध शासकीय विभागांकडून अधिग्रहित करण्यात आले होते. आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे व पूर परिस्थितीचा धोका पाहता विविध जिल्ह्यांतून वाहने मागविणे शक्य नाही. त्या वाहनांची गरज तेथेच भासणार आहे. त्यामुळे गरजेनुसार वाहन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी चर्चा करताना विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी खासगी वाहन सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीकडून भाड्याने वाहने घेतली जातील, असे सांगितले होते. त्यानुसार ई-निविदा जारी केली जाईल. उपायुक्त सामान्य प्रशासन यांच्या अध्यक्षतेत पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती दोन तीन दिवसात निर्णय घेईल. अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी खासगी कंपनीकडून सेवा घेतली जाईल. यासाठी कराराचे प्रारुप आरटीओ स्तरावर तयार केला जाईल. एका वाहनावर दररोज सुमारे १२०० रुपये खर्च होतील व यात लक्झरी वाहन सेवेचा खर्च समाविष्ट नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.सूत्रांच्या मते खासगी वाहन सेवा उपलब्ध करून देणाऱ्यांकडून लक्झरी वाहने देखील मागविले जातील. याचा खर्च निविदेनंतर निश्चित केला जाईल. या संदर्भात लोकमतने विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त के.एन.के राव यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी वाहनांची सेवा घेण्यात येणार असल्याचे सांगत त्यावर किती खर्च येईल हे निश्चित नसल्याचे सांगितले. यावर चर्चा सुरू असल्याचे कारण त्यांनी दिले. निविदा प्रक्रियेबाबत विचारणा केली असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.

पावसाचे फक्त निमित्तविभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी पावसाचे कारण समोर करीत खासगी वाहन कंपनीकडून सेवा घेण्याचे सूतोवाच केले आहे. वास्तविकता शिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, तंत्र शिक्षण विभाग, शासकीय महाविद्यालय, विद्यापीठास,ह असे अनेक विभाग आहेत की जेथे अधिकाऱ्यांना वाहनांची सुविधा देण्यात आली आहे. हिवाळी व पावसाळी अधिवेशनादरम्यान त्यांच्याकडून वाहने मागविली जातात. कारण, पावसाळ्यात त्यांना कुठल्याही दौऱ्यावर जाण्याची गरज पडत नाही. याशिवाय असे बरेच शासकीय विभाग आहेत की ज्यांच्याकडून वाहन मागविली जाऊ शकतात.

टॅग्स :Governmentसरकार