शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: भारत बंदला नागपुरात संमिश्र प्रतिसाद, शहरात ठिकठिकाणी आंदोलन

By आनंद डेकाटे | Updated: August 21, 2024 15:10 IST

Bharat Bandh in Nagpur: अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअर लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात बुधवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले. नागपुरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.  

- आनंद डेकाटे नागपूर - अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअर लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात बुधवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले. नागपुरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शहरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले.  बसपा, बीआरएसपी, रिपाइं, पीरिपासह विविध राजकीय पक्ष आणि विविध सामाजिक संघटना या बंदच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्या होत्या. 

आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा १ तारखेला निर्णय येताच याविरोधात देशभरात असंतोष पसरला होता. त्यानुसार काही सामाजिक संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले होते. बुधवारी शहरात सकाळपासूनच इंदोरा चौक,कमाल चौक, त्रिशरण चौक, संविधान चौकासह विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शहराच्या विविध भागातील संघटनांनी रॅली काढली. संविधान चौकात या रॅलीचे जाहीर सभेत रूपांत झाले. संविधान चौकात मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र आले. त्यामुळे वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली होती. 

इंदोरा चौक, दीक्षाभूमी, संविधान चौकात मोठा बंदोबस्त बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वच ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. परंतु इंदोरा, चौक, कमाल चौक, दीक्षाभूमी आणि दीक्षाभूमी येथे अधिकचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

साहित्यिक-विचारवंतांचेही बंदला समर्थन या भारत बंदला साहित्यिक व विचारवंतांनी आपले समर्थन जाहीर केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे एससी आणि एसटी या दोन्ही सामाजिक-राजकीय शक्तींचे आरक्षण संपविले जाईल. त्यांची एकीकरणाची अभिप्रेत प्रक्रियाही संपिवली जाईल. त्यांच्या सामाजिक व राजकीय भवितव्याचे पंख छाटले जातील, हे होऊ नये म्हणून या निकालाविरुद्ध होणाऱ्या या बंदला आम्ही जाहीर समर्थन देत असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, लक्ष्मण माने, रावसाहेब कसबे, नागेश चौधरी, रूपाताई कुळकर्णी, सूर्यनारायण रणसुभ, उत्तम कांबळे, रवींद्र इंगळे, गौतमीपूत्र कांबळे, प्रभू राजगडकरउत्तम जहागीरदार यांनी म्हटले आहे.

टॅग्स :nagpurनागपूरBharat Bandhभारत बंद