शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मेडिकल इस्पितळ : मार्चपर्यंत ५८ कोटींच्या यंत्रसामुग्रीची खरेदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 00:25 IST

मेडिकलमधील तीन महत्त्वपूर्ण विभागाच्या अत्याधुनिक अतिदक्षता विभागासाठी (आयसीयू) व ट्रॉमा केअर सेंटरच्या यंत्रसामुग्रीसाठी ५८ कोटी रुपयांना मंजुरी मिळाली. मात्र, मार्च २०१९ पर्यंत ही खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याची अट असल्याने अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे व विभागप्रमुख डॉ. राज गजभिये यांनी मुंबई गाठली. हाफकिन कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक संपदा मेहता यांची भेट घेतली. याचे फलित म्हणून मार्चपर्यंत ही खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याचे नुकतेच हमीपत्र मेडिकलला मिळाले. यामुळे लवकरच ‘आयसीयू’सह ‘ट्रॉमा’मधील यंत्रसामुग्रीचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देहाफकिनने दिले हमीपत्र : तीन आयसीयू व ट्रॉमामध्ये उपलब्ध होणार यंत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेडिकलमधील तीन महत्त्वपूर्ण विभागाच्या अत्याधुनिक अतिदक्षता विभागासाठी (आयसीयू) व ट्रॉमा केअर सेंटरच्या यंत्रसामुग्रीसाठी ५८ कोटी रुपयांना मंजुरी मिळाली. मात्र, मार्च २०१९ पर्यंत ही खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याची अट असल्याने अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे व विभागप्रमुख डॉ. राज गजभिये यांनी मुंबई गाठली. हाफकिन कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक संपदा मेहता यांची भेट घेतली. याचे फलित म्हणून मार्चपर्यंत ही खरेदी प्रक्रिया पूर्ण करण्याचे नुकतेच हमीपत्र मेडिकलला मिळाले. यामुळे लवकरच ‘आयसीयू’सह ‘ट्रॉमा’मधील यंत्रसामुग्रीचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे.मेडिकलमध्ये केवळ औषधवैद्यकशास्त्र विभागाचे २० खाटांचे ‘आयसीयू’ आहे. याच ‘आयसीयू’मध्ये इतरही विभागाचे गंभीर रुग्णही ठेवले जातात. यामुळे हा विभाग नेहमीच फुल्ल असतो. याची दखल अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी घेतली. पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेच्या निधीतून ‘सर्जिकल इन्टेन्सिव्ह केअर युनिट’, ‘मेडिसीन इन्टेन्सिव्ह केअर युनिट’ आणि ‘पेडियाट्रिक इन्टेन्सिव्ह केअर युनिट’चे बांधकाम हाती घेतले. प्रत्येक ‘युनिट’मध्ये २० प्रमाणे एकूण ६० खाटांची सोय केली. दोन वर्षात याचे बांधकाम पूर्णही झाले. परंतु आता प्रतीक्षा होती यंत्रसामुग्रीची. यासाठी दोन महिन्यांपूर्वी ५४ कोटी ३८ लाख ९८ हजार रुपयांच्या निधीला तर ट्रॉमा केअर सेंटरमधील यंत्रसामुग्रीसाठी तीन कोटी ३८ लाखांची मंजुरी दिली. हा निधी यंत्रसामुग्रीच्या खरेदीचे अधिकार असलेल्या ‘हाफकिन’ कंपनीकडे वळताही केला. ३१ मार्च २०१९ पूर्वी खरेदी प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक होते. परंतु डिसेंबर महिना उजळूनही खरेदी प्रक्रियेला सुरुवात झाली नव्हती. याबाबत मेडिकल प्रशासनाने ‘हाफकिन’ कंपनीला पत्र दिले. स्वत: अधिष्ठाता डॉ. निसवाडे व शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. राज गजभिये यांनी मुंबई गाठून हाफकिन कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक संपदा मेहता यांना भेटले. यापुढाकारामुळे कंपनीने मुदतीपूर्व सुमारे ५८ कोटी रुपयांची खरेदी करण्याचे हमीपत्र मेडिकल प्रशासनाला दिले. याला डॉ. निसवाडे यांनी दुजोराही दिला आहे.

 

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयnagpurनागपूर