शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

नागपूर मेडिकल कॉलेज इस्पितळ : अखेर ब्रॅकेथेरपी यंत्राच्या सोर्सला मिळाला निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 01:24 IST

शरीराच्या अंतर्गत भागात रेडिएशन देण्यासाठी उपयुक्त ‘ब्रॅकेथेरपी’ यंत्राचा ‘सोर्स’ विकत घेण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा निधी खर्च करण्यास सोमवारी शासनाने मंजुरी दिल्याने कर्करोगाच्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, हे यंत्र ५ डिसेंबरपासून बंद होते. संबंधित विभागाने यंत्र बंद पडण्यापूर्वीच, आॅगस्ट महिन्यात ‘सोर्स’ विकत घेण्याचा प्रस्ताव पाठविला होता. मात्र आता निधीला मंजुरी मिळाली.

ठळक मुद्देमहिन्यानंतर कर्करोग रुग्णांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शरीराच्या अंतर्गत भागात रेडिएशन देण्यासाठी उपयुक्त ‘ब्रॅकेथेरपी’ यंत्राचा ‘सोर्स’ विकत घेण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा निधी खर्च करण्यास सोमवारी शासनाने मंजुरी दिल्याने कर्करोगाच्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, हे यंत्र ५ डिसेंबरपासून बंद होते. संबंधित विभागाने यंत्र बंद पडण्यापूर्वीच, आॅगस्ट महिन्यात ‘सोर्स’ विकत घेण्याचा प्रस्ताव पाठविला होता. मात्र आता निधीला मंजुरी मिळाली.भारतात इतर राज्याच्या तुलनेत कर्करोगाच्या अकाली मृत्यूमध्ये महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. यात ‘हेड अ‍ॅण्ड नेक कॅन्सर’मध्ये विदर्भ ‘राजधानी’ ठरत आहे. नागपुरात इतर कर्करोगाच्या तुलनेत डोक्याचा आणि मानेच्या कर्करोगाचे २२.७ टक्के रुग्ण आहेत. कर्करोगाचे जे रुग्ण उपचारासाठी येतात त्यात तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यातील बहुसंख्य रुग्ण हे दारिद्र्य रेषेखालील किंवा दारिद्र्य रेषेवरील असतात. यामुळे या रुग्णांसाठी मेडिकलचा कर्करोग विभाग आशेचा किरण ठरले आहे. मात्र, विभागाच्या विकासाला शासनाचा उदासीनपणा नडला आहे. आजही कालबाह्य झालेल्या कोबाल्टवर व ‘ब्रॅकेथेरपी’ यंत्रावर रुग्ण अवलंबून आहेत. ‘ब्रॅकेथेरपी’ यंत्राचा ‘सोर्स’ संपल्याने ५ डिसेंबरपासून हे यंत्र बंद पडले होते. हे उपकरण बंद पडण्यापूर्वी आॅगस्ट महिन्यात नवा ‘सोर्स’ विकत घेण्याचा प्रस्ताव विभागाकडून पाठविण्यात आला होता. परंतु चार महिन्यानंतर आता नऊ लाख १५ हजार ८०० रुपयांच्या निधीतून ‘सोर्स’ खरेदी करण्यास मंजुरी मिळाली. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतील निधीतून हा खर्च करण्याचे आदेश देण्यात आले आहे. यामुळे लवकरच रुग्णसेवेत हे यंत्र सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, यंत्र बंद पडण्यापूर्वीच खरेदीला मंजुरी मिळाली असती तर कर्करोग रुग्ण अडचणीत आले नसते, अशीही चर्चा आहे.कॅन्सर इन्स्टिट्यूटची प्रतीक्षा कधी संपणारमेडिकलमध्ये कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१२ च्या हिवाळी अधिवेशनात केली होती. परंतु तेव्हापासून हे इन्स्टिट्यूट कागदावरच आहे. इन्स्टिट्यूट स्थापनेबाबत दाखल जनहित याचिकेवर जून २०१७ मध्ये न्यायालयाने दोन वर्षात कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारावे, असे निर्देश दिले होते. परंतु आता दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. परंतु इन्स्टिट्यूटच्या बांधकामाला सुरुवातही झाली नाही.

 

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयcancerकर्करोग