शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

नागपूर मेडिकल कॉलेज इस्पितळालाच झाला डेंग्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 11:33 PM

डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अ‍ॅण्टीबायोटिक किंवा अ‍ॅण्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. अशा डेंग्यूच्या विळख्यात मेडिकल व डेंटल महाविद्यालयातील १२-१५ विद्यार्थी व निवासी डॉक्टर सापडले आहेत. विविध वॉर्डात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, सध्या मेडिकलमध्ये याच आजाराचे २५वर रुग्ण उपचार घेत आहेत. यातच रुग्णालयाच्या परिसरात, डेंग्यूचा प्रकोप वाढल्याने रुग्णांसोबतच त्यांचे नातेवाईक, परिचारिका व कर्मचाऱ्यांना हा आजार होण्याचा धोका वर्तविला जात आहे.

ठळक मुद्दे१५ वर विद्यार्थी, डॉक्टरांवर उपचार : रुग्ण, नातेवाईक, परिचारिकाही धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अ‍ॅण्टीबायोटिक किंवा अ‍ॅण्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. अशा डेंग्यूच्या विळख्यात मेडिकल व डेंटल महाविद्यालयातील १२-१५ विद्यार्थी व निवासी डॉक्टर सापडले आहेत. विविध वॉर्डात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, सध्या मेडिकलमध्ये याच आजाराचे २५वर रुग्ण उपचार घेत आहेत. यातच रुग्णालयाच्या परिसरात, डेंग्यूचा प्रकोप वाढल्याने रुग्णांसोबतच त्यांचे नातेवाईक, परिचारिका व कर्मचाऱ्यांना हा आजार होण्याचा धोका वर्तविला जात आहे.डेंग्यू व स्क्रब टायफससह साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. मेडिकलमध्ये डेंग्यूसारख्या आजाराने नुकताच एका चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे, तर ४०च्या वर डेंग्यूचे रुग्णांची नोंद आहे. अशाही स्थितीत सर्वकाही आलबेल आहे, असेच दाखवण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून होत आहे. मात्र, परिस्थिती अतिशय वाईट आहे. मेडिकल परिसरातील विविध वसतिगृहातील विद्यार्थी डेंग्यूच्या विळख्यात सापडले आहेत. आता यात निवासी डॉक्टरांची भर पडली आहे.सूत्रानुसार, शासकीय दंत महाविद्यालयातील (डेंटल) आठच्यावर विद्यार्थी तर मेडिकलचे तीनच्या वर विद्यार्थी आणि चारवर निवासी डॉक्टर विविध वॉर्डात डेंग्यूवर उपचार घेत आहेत. मेडिकल रुग्णालयाच्या परिसरात डेंग्यू वाढत असताना अद्यापही उपाययोजना हाती घेण्यात आली नाही. विद्यार्थ्यांच्या मते, वसतिगृहांमध्ये व परिसरात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले आहे. यातच सांडपाण्याची पाईपलाईन काही ठिकाणी बुजल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यासंदर्भात तक्रारी करण्यात आल्या आहेत, परंतु साधी फवारणी करण्यात आली नसल्याचे विद्यार्थी व निवासी डॉक्टरांचे म्हणणे आहे.डेंग्यूची चाचणीही बंदडेंग्यूची लक्षणे असलेल्या रुग्णाची ‘एनएस१’ चाचणी केली जाते. पहिल्या पाच दिवसांत ही चाचणी उपयोगी ठरते. त्यानंतर ही चाचणी निगेटिव्ह येते. यामुळे दुसरी ‘आयजीएम’ ही चाचणी करावी लागते. तर यापूर्वी डेंग्यूचे संक्रमण झाले आहे का हे पाहण्यासाठी ‘आयजीजी’ ही चाचणी करावी लागते. रुग्णाच्या दृष्टिकोनातून या तीनही चाचण्या महत्त्वाच्या आहेत. परंतु गेल्या आठवड्यापासून या चाचण्या बंद पडल्या आहेत.

 

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयdengueडेंग्यू