शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

नागपुरात आयुक्तांच्या दाव्यांची महापौर करणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 10:48 IST

महापौर संदीप जोशी यांनी प्रशासनाने केलेल्या दाव्याची चौकशी करण्यासाठी विविध समित्यांची सोमवारी घोषणा केली. यातून प्रशासन व पदाधिकारी यातील वाद वाढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देसमित्यांची स्थापनापदाधिकारी व प्रशासनातील वाद वाढला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरमध्ये कोविडचा प्रादुर्भाव दररोज वाढत असून मृत्यूसंख्या ५०० च्या घरात पोहचली आहे. मनपा प्रशासनाकडून रुग्णांसाठी व्यवस्था असल्याचा दावा केला जात आहे. तर कोविड रुग्णांसाठी खासगी आणि शासकीय रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध नाहीत, कोविड केअर सेंटरमध्ये पण रुग्णांना पाठविले जात नाही, असे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दावे-प्रतिदावे विचारात घेता महापौर संदीप जोशी यांनी प्रशासनाने केलेल्या दाव्याची चौकशी करण्यासाठी विविध समित्यांची सोमवारी घोषणा केली. यातून प्रशासन व पदाधिकारी यातील वाद वाढण्याची शक्यता आहे.

समित्यांमार्फत मनपाद्वारे नागपूरमध्ये कोविड-१९ च्या रुग्णांसाठी खासगी आणि शासकीय रुग्णालयांत केलेली खाटांची व्यवस्था, कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध खाटांची संख्या, हॉटेल्स आणि मनपाच्या रुग्णालयात खाटांची व्यवस्था याची पाहणी करून आपला अहवाल बैठकीत सादर करतील. मनपा सभेत ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी मांडलेल्या स्थगन प्रस्तावावर संदीप जोशी यांनी कोविड - १९ बद्दल समन्वय करण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांची समिती गठित केली आहे. या समितीची बैठक सोमवारी मनपा मुख्यालयात पार पडली. वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई यांनी २४ खासगी रुग्णालयांत १,८७६ खाटांची व्यवस्था करण्यात आली असून सद्य:स्थितीत ५७५ बेड्स उपलब्ध असल्याचे सांगितले.

मेयो, मेडिकल रुग्णालयात १२०० खाटांची व्यवस्था आहे. जीएमसीमध्ये ६०० बेड्स आहे त्यात ३४० रुग्ण भरती आहेत, आयजीएमसीमध्ये ६०० बेड्स आहेत त्यात २९५ रुग्ण भरती आहे, दोन्ही हॉस्पीटलमध्ये आॅक्सीजनची व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच त्यांनी मनपा व्दारा संचालित कोविड टेस्टिंग सेंटरची माहिती दिली.अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले की, आमदार निवास, पोलिस क्वॉर्टर पाचपावली, व्हीएनआयटी होस्टेल, सिम्बॉयसीस होस्टेल आणि वनामतीमध्ये २८०० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त ४,७३० खाटांची व्यवस्था रुग्णांसाठी सज्ज आहे. तसेच ३,३५६ खाटांची व्यवस्था प्रस्तावित आहे. हॉटेल्समध्येसुद्धा कोविड केअर सेंटरची परवानगी देण्यात आली आहे. प्रशासनाचे दावे आणि वर्तमान परिस्थितीमध्ये मोठी तफावत असल्याने सत्य परिस्थिती जाणण्यासाठी समित्या गठित करण्यात येत आहे. समित्या सत्य परिस्थितीची पाहणी करून आपला रिपोर्ट देतील, अशी माहिती संदीप जोशी यांनी दिली. बैठकीत आमदार प्रवीण दटके, यांच्यासह समितीतील सदस्य उपस्थित होते.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSandip Joshiसंदीप जोशी