शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या महापौरांनी चौकशीचे आदेश दिलेल्या एजन्सीला पुन्हा कंत्राट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 23:49 IST

महापालिकेच्या विविध विभाग व क्षेत्रीय कार्यालयात सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या काही खासगी सुरक्षा एजन्सींनी बोगस कागदपत्रे सादर करून कंत्राट मिळविले होते. अशा एजन्सीकडून सुरक्षा रक्षकांचे आर्थिक शोषण होत असल्याने या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाईबाबतचा अहवाल महिनाभरात सादर करण्याचे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी सभागृहात दिले होते. महापौरांच्या आदेशानुसार चौकशी तर दूरच बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्या सुरक्षा एजन्सीला पुन्हा मुदतवाढ देण्याचा घाट महापालिकेत घातला आहे.

ठळक मुद्देआदेश धाब्यावर : बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्या सुरक्षा एजन्सीला मुदतवाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या विविध विभाग व क्षेत्रीय कार्यालयात सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या काही खासगी सुरक्षा एजन्सींनी बोगस कागदपत्रे सादर करून कंत्राट मिळविले होते. अशा एजन्सीकडून सुरक्षा रक्षकांचे आर्थिक शोषण होत असल्याने या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाईबाबतचा अहवाल महिनाभरात सादर करण्याचे आदेश महापौरनंदा जिचकार यांनी सभागृहात दिले होते. महापौरांच्या आदेशानुसार चौकशी तर दूरच बोगस कागदपत्रे सादर करणाऱ्या सुरक्षा एजन्सीला पुन्हा मुदतवाढ देण्याचा घाट महापालिकेत घातला आहे.महापालिकेत सुरक्षा रक्षक पुरविण्याचा कंत्राट मिळण्यासाठी काही एजन्सींनी बोगस कागदपत्रे सादर केली. काळ्या यादीत असूनही महापालिकेची फसवणूक करून कंत्राट मिळविले. याबाबतचा प्रश्न विधी विशेष समितीचे सभापती अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम यांनी सभागृहात उपस्थित करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापौरांनी आयुक्तांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु चौकशी न करताच सुरक्षा एजन्सींच्या कंत्राटाला मुदतवाढ देण्याला मंजुरी देण्यात आली आहे.ई-निविदा काढून कंत्राटी तत्त्वावर शासनाच्या किमान वेतन दरानुसार सुपर सिक्युरिटी सर्व्हिसेस नागपूर, युनिटी सिक्युरिटी फोर्स, किशोर एजन्सीज आणि इंडस्ट्रियल  सर्व्हिसेस नागपूर अशा चार सुरक्षा एजन्सींना ४ जानेवारी २०१८ रोजी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्याचे कंत्राट देण्यात आले. त्यानुसार २८९ सुरक्षा रक्षक तैनात आहेत. यावर वर्षाला ६.९९ कोटी खर्च होतात. कंत्राटाची मुदत ३१ डिसेंबर २०१८ रोजी संपत आहे. मुदत संपत असल्याने नवीन निविदा काढून पात्र एजन्सीची नियुक्ती करणे अपेक्षित होते. परंतु कंत्राटाला मुदतवाढ देऊन तीन एजन्सीला काम देण्याचा निर्णय १ डिसेंबरच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र यात फक्त इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस एजन्सीला अपात्र ठविण्यात आले. किशोर एजन्सीला मात्र पुन्हा मुदतवाढ देण्यात आली.फेरनिविदेची महापौर, आयुक्तांकडे मागणीकिशोर एजन्सीने बोगस कागदपत्रे सादर केली होती तर इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस एजन्सीला काळ्या यादीत टाकण्यात आले होते. या कंपन्यांनी महापालिकेच्या शर्ती व अटींचे उल्लंघन केले. महापौरांच्या आदेशानुसार या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई अपेक्षित होती. परंतु चौकशी झाली नाही. उलट या एजन्सींना पुन्हा कंत्राट देण्याचा घाट घातला आहे. या संदर्भात महापौर, सत्तापक्षनेते, स्थायी समिती अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. नवीन निविदा काढण्याची मागणी केली. आयुक्तांनी याला सहमती दर्शविली.अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम, सभापती विधी विशेष समिती

 

टॅग्स :MayorमहापौरNanda Jichakarनंदा जिचकार