शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर महामॅरेथॉन; पहिल्याच दिवशी हजार धावपटूंची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 11:07 IST

‘आॅरेंजसिटी’ अशी ख्याती असलेल्या नागपूर शहरात येत्या ११ फेब्रुवारीला ‘लोकमत महामॅरेथॉन’चे आयोजन होत आहे. नागपूर महामॅरेथॉनच्या नाव नोंदणीला शुक्रवारी शानदार सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी एक हजार धावपटूंनी नोंदणी करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

ठळक मुद्देया महामॅरेथॉनच्या नोंदणीत जास्तीत जास्त धावपटू, नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९९२२२०००६३ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. लोकमत समूहातर्फे आयोजित नागपूर व कोल्हापूर महामॅरेथॉनसाठी नोंदणी सुरू झाली आहे. इच्छुकांना या दोन्ही महामॅरेथॉनची नोेंदणी नागपूर येथील लोकमत भवन, लोकमत चौक, वर्धा रोड येथे सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत करता येईल.या महामॅरेथॉनमध्ये नोंदणी आॅनलाईनही करता येईल. यासाठी धावपटूंनी पुढील वेबसाईटवर जावे. www.mahamarathon.com

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘आॅरेंजसिटी’ अशी ख्याती असलेल्या नागपूर शहरात येत्या ११ फेब्रुवारीला ‘लोकमत महामॅरेथॉन’चे आयोजन होत आहे. नागपूर महामॅरेथॉनच्या नाव नोंदणीला शुक्रवारी शानदार सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी एक हजार धावपटूंनी नोंदणी करीत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.लोकमत समूहातर्फे ऐतिहासिक शहर औरंगाबाद तसेच नाशिक येथील प्रचंड यशानंतर नागपुरातील धावपटूंमध्ये नाव नोंदणीसाठी चढाओढ सुरू आहे. विविध सामाजिक ग्रुप आणि कॉर्पोरेट ग्रुप तसेच आरोग्याप्रति जागरुक असलेले नागरिक महामॅरेथॉनमध्ये धावण्यास सज्ज झाले आहेत.नाशिकपासून यावर्षी ‘लोकमत महामॅरेथॉन’चा श्रीगणेशा झाला आहे. नाशिक येथील उदंड प्रतिसादानंतर औरंगाबाद येथे १७ डिसेंबर रोजी महामॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. आता ११ फेब्रुवारीला नागपुरात महामॅरेथॉन आटोपल्यानंतर चौथा आणि अखेरचा टप्पा कोल्हापूर असेल. कोल्हापुरात १८ फेब्रुवारीला आयोजन होणार आहे.सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात ‘लोकमत’ने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. समाजात आरोग्य, फिटनेसविषयी जागरुकता निर्माण व्हावी आणि एकोपा वाढावा या उदात्त हेतूने ‘लोकमत’ समूहातर्फे महामॅरेथॉनचे आयोजन केले जात आहे. नाशिक तसेच औरंगाबादेत झालेल्या महामॅरेथॉनला क्रीडारसिक, खेळाडू, ज्येष्ठ नागरिक व महिलांसह देश-विदेशातील धावपटूंचा उदंड प्रतिसाद लाभला होता. आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेल अशा अद्ययावत तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग झालेली ही अत्युच्च दर्जाची ‘लोकमत’ समूहाची मॅरेथॉन असल्याची धावपटूंची प्रतिक्रिया होती. भोजवानी फुडस् हे मुख्य प्रायोजक असून सहप्रायोजक कुकरेजा इन्फ्रास्ट्रक्चर हे आहेत. आयोजनात मेघे ग्रुपचे नेल्सन मदर अ‍ॅण्ड चाईल्ड केअर हॉस्पिटलचे सहकार्य लाभले आहे. प्राईड पार्टनर जी.एच. रायसोनी युनिव्हर्सिटी आणि हेल्थ केअर पार्टनर विदर्भ इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस(विम्स) हे आहेत.

टॅग्स :Lokmat Nagpur Maha Marathon 2018लोकमत नागपूर महामॅरेथॉन २०१८