शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

आंतरप्रेस टी-२० क्रिकेट सामन्यात नागपूर लोकमत अंतिम फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 11:03 IST

नितीन पटारियाच्या अष्टपैलू कामगिरीच्या (सहा बळी, ३० धावा) बळावर लोकमतने उपांत्य सामन्यात लोकशाही वार्ता संघाचा सात गड्यांनी सहज पराभव करीत २० व्या एसजेएएन- ओसीडब्ल्यू आंतर प्रेस टी-२० आमंत्रित क्रिकेट स्पर्धेची बुधवारी अंतिम फेरी गाठली.

ठळक मुद्दे२० वे एसजेएएन- ओसीडब्ल्यू आंतरप्रेस टी-२० क्रिकेट सामनेनितीन पटारियाची चमकदार खेळी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नितीन पटारियाच्या अष्टपैलू कामगिरीच्या (सहा बळी, ३० धावा) बळावर लोकमतने उपांत्य सामन्यात लोकशाही वार्ता संघाचा सात गड्यांनी सहज पराभव करीत २० व्या एसजेएएन- ओसीडब्ल्यू आंतर प्रेस टी-२० आमंत्रित क्रिकेट स्पर्धेची बुधवारी अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात हितवादने टीओआयचा ३३ धावांनी पराभव केला. गतविजेत्या लोकमतची अंतिम लढत हितवादविरुद्ध शुक्रवारी दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज मैदानावर होईल.स्पोर्टस जर्नलिस्ट असोसिएशन आॅफ नागपूर(एसजेएएन) तर्फे आयोजित या स्पर्धेचे पुरस्कर्ते आॅरेंजसिटी वॉटर हे असून स्टेट बँक आॅफ इंडिया सहपुरस्कर्ते आहेत. डीएनसीच्या वसंतनगर मैदानावर उपांत्य लढतीत लोकशाही वार्ता संघाला १९.५ षटकात १०७ धावांत बाद केल्यानंतर लोकमतने विजयी लक्ष्य ११.३ षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात गाठले. प्रवीण लोखंडेने सर्वाधिक ५१, नितीन पटारियाने ३० व शरद मिश्राने नाबाद १४ धावा केल्या. त्याआधी पटारियाने स्वत: तीन झेल घेत सहा गडी १६ धावांत बाद केले. तोच सामन्याचा मानकरी ठरला.आंबेडकर कॉलेज मैदानावर दुसऱ्या उपांत्य लढतीत हितवादने २० षटकांत ७ बाद १६७ धावा उभारल्या. त्यात पंकज बोरकरने २० चेंडूत ३० व अनुपम तिमोथीने ३३ चेंडूंत २८ धावा केल्या. प्रत्युत्तरात टाइम्स संघ ८ बाद १३४ धावांपर्यंतच मजल मारू शकला. विनय पांडेने ३० चेंडूत सर्वाधिक ५१ धावा काढल्या पण संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. २१ धावांत तीन बळी घेणारा रवी डफ सामनावीर ठरला. विदर्भाचे माजी कर्णधार प्रवीण हिंगणीकर, रेशीमबाग क्रिकेट अकादमीचे संचालक राजू कावरे, बालपांडे कॉलेज आॅफ फार्मसीचे संचालक मनोज बालपांडे आणि छत्रपती पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ क्रीडा संघटक गिरिश गदगे यांच्याहस्ते पुरस्कार देण्यात आले.

टॅग्स :Cricketक्रिकेट