लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: लोकसभा निवडणुकीच्या बहुप्रतिक्षित अशा निकालासाठी नागपूर व रामटेक मतदारसंघात मतमोजणी सुरू झाली आहे. नागपूरातल्या कळमना बाजारात ही मोजणी प्रक्रिया सुरू आहे. दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात पहिल्याच राऊंडमध्ये बहुतांश टेबलवर भाजपचे नितीन गडकरी आघाडीवर आहेत.नागपूर जिल्ह्यातील उमरेडमधील एका ईव्हीएमची बॅटरी डिर्स्चाज झाली असून त्यावर काँग्रेसने जोरदार हरकत घेतली.नागपुरात एकूण मतदारसंख्या २१ लाख ६० हजार २१७ असून त्यात पुरुष मतदार १० लाख ९६ हजार ३३० तर स्त्रिया मतदार १० लाख ६३ हजार ८१०आहेत. इतर मतदारांची संख्या ७७ आहे. नागपुरात झालेल्या मतदानाची टक्केवारी ५४.७४ एवढी होती.२०१४ च्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांना मात दिली होती. गडकरी यांना ५,८७,७६७ मते मिळाली होती. विलास मुत्तेमवार यांना ३,०२,९१९ मते पडली होती.
नागपूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९; मतमोजणी सुरू; आरंभापासून कोणी घेतली आघाडी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 08:54 IST
Nagpur Lok Sabha Election Results 2019; लोकसभा निवडणुकीच्या बहुप्रतिक्षित अशा निकालासाठी नागपूर व रामटेक मतदारसंघात मतमोजणी सुरू झाली आहे.
नागपूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९; मतमोजणी सुरू; आरंभापासून कोणी घेतली आघाडी?
ठळक मुद्देउमरेडमधील एका ईव्हीएमची बॅटरी डिस्चार्ज