शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

कास्ट व्हॅलिडिटी ऑनलाईन वितरणात राज्यात नागपूर आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:09 IST

आनंद डेकाटे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागरिकांना जात पडताळणी प्रमाणपत्र लवकर मिळावे व कामात सुलभता यावी, या उद्देशाने ...

आनंद डेकाटे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागरिकांना जात पडताळणी प्रमाणपत्र लवकर मिळावे व कामात सुलभता यावी, या उद्देशाने शासनाने ‌‘कास्ट व्हॅलिडिटी ऑनलाईन वितरण’ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यात नागपूर जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. तब्बल चार हजार अर्जापैकी तीन हजारावरील अर्ज मार्गी लावण्याची कामगिरी नागपूरने केली आहे.

जात पडताळणीच्या कामाबाबत नेहमीच ओरड असते. यातच एकेका प्रमाणपत्रासाठी होत असलेल्या विलंबामुळे नागरिक अधिकच त्रस्त होतात. यामुळे राज्य शासनाने एकूणच कामांमध्ये ऑनलाईनचा वाढवलेला वापर यातही करण्यात आला आहे. सध्या कास्ट व्हॅलिडिटी ऑनलाईन वितरणाचे काम जोमात सुरू आहे. राज्यभरातील जात पडताळणी समितीच्या कामात यामुळे गती आली असली तरी राज्यातील इतर समितीच्या मानाने नागपुरातील काम जोमात असल्याचे दिसून येते. आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात एकूण ४३८५ जणांनी जात पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज केला. यापैकी ३०३३ जणांचे अर्ज निकाले निघाले असून प्रमाणपत्र त्यांना वितरितही झाले आहे. तर १३७० अर्जावर समितीचे काम सुरु आहे.

राज्यातील इतर कुठलाही जिल्हा नागपूरच्या आसपासही नाही. अहमदनगर व अमरावती जिल्ह्याचाच विचार केल्यास तिथे ५ हजारावर अर्ज सादर झाले असून अहमदनगरमध्ये १९७७ व अमरावतीत १४३१ अर्ज निकाली निघालेले आहे. नाशिक जिल्ह्यातील ४२८८ अर्जापैकी केवळ ४२३ अर्ज निघाली निघाले आहेत. एकूणच राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत नागपूर जिल्ह्यातील जात पडताळणीच्या कामाला चाांगलीच गती मिळाल्याचे दिसून येते.

सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन होणे आवश्यक

जात पडताळणीसाठी भरलेला ऑनलाईन अर्ज रिजेक्ट होऊ नये, यासाठी अर्जदाराने ऑनलाईन अर्ज भरताना काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी सर्व मूळ कागदपत्रांचे परिपूर्ण स्कॅनिंग करावे. शपथपत्र भरताना त्याची तिन्ही पाने स्कॅन करावी. एकूणच सर्व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड केल्यास अर्जदाराला त्याचे प्रमाणपत्र लवकरच उपलब्ध होते.

- सुरेंद्र पवार, अध्यक्ष, जात पडताळणी समिती, नागपूर

राज्यातील जिल्हानिहाय स्थिती

जिल्हा अर्ज सादर अर्ज निकाली

नागपूर ४,३८५ ३,०३३

अहमदनगर ५,१०१ १,९७७

पुणे २,०८४ १,७८५

अमरावती ५,४८ १,४३१

ठाणे १,७७२ १,२४६

औरंगाबाद १,८७१ १,०५०

नाशिक ४,२८८ ४२३

मुंबई उपनगर ६५२ ६२