शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

'सूर्यघर' योजनेत नागपूर आघाडीवर : ३३,६४१ घरांच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती संच

By आनंद डेकाटे | Updated: June 16, 2025 19:05 IST

Nagpur : १३२.३५ मेगावॅट उत्पादन क्षमता विकसित

आनंद डेकाटे, नागपूर 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रधानमंत्री 'सूर्यघर' - मोफत वीज योजनेत नागपूर जिल्हा महाराष्ट्रात सर्वात आघाडीवर आहे. राज्यभरात एकूण २,१२,६४० सौर ऊर्जा निर्मिती संच लागले आहेत. यापैकी एकट्या नागपूर जिल्ह्यात ३३,६४१ घरांच्या छतावर सौर ऊर्जा निर्मिती संच लागले आहेत. या माध्यमातून १३२.३५ मेगावॅट अपारंपरिक ऊर्जा निर्माण करण्याची प्रचंड क्षमता विकसित झाली आहे.

'सूर्यघर' योजनेचे उद्दिष्ट नागरिकांना स्वच्छ आणि स्वस्त वीज पुरवणे आहे. यामध्ये नागपूर आघाडीवर आहे. १५ जून रोजी एकाच दिवशी १२४ नवीन युनिट्स (सोलर रूफ टॉप) बसवण्यात आली. एका दिवसात सर्वाधिक युनिट बसवण्याचा हा विक्रम आहे. नागपुरात सौरऊर्जेकडे नागरिकांचा कल झपाट्याने वाढत आहे. 'सूर्यघर' योजनेद्वारे नागपूर 'सूर्यऊर्जा' अनुभवत आहे.

महावितरणच्या मते, जळगाव १५,८६८ युनिट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुणे १५६३२ युनिट्ससह त्याच्या मागे आहे. नागपूरने दोन्ही शहरांच्या एकत्रित युनिट्सपेक्षा जास्त युनिट्स बसवले आहेत. नागपूर विभागातील (विदर्भ) इतर जिल्हेही सोलर रूफ टॉप बसवण्यात पुढे आहेत. अमरावती-१२,३३१, वर्धा- ६३७६, बुलढाणा-६२३२, अकोला-६१३०, चंद्रपूर-५६१६, यवतमाळ-४९९८, भंडारा-३५९१, वाशिम-२५६२, गोंदिया-२५११ आणि गडचिरोलीमध्ये ११४१ युनिट बसवण्यात आले आहेत.

टॅग्स :nagpurनागपूर