शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
4
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
5
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
7
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
8
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
9
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
10
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
11
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
12
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
13
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
14
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
15
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
16
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
17
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
18
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
19
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
20
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?

नागपूर ‘एमआयडीसी’त भूखंडाच्या लीजचे हस्तांतरण थांबले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 10:34 IST

उद्योगाला चालना देण्याचे शासनाचे धोरण आहे. पण खुद्द शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे राज्यातील एमआयडीसीतील उद्योगांचा विकास खोळंबला आहे.

ठळक मुद्देरेडिरेकनरचे दर व कॅपिटल गेन टॅक्स मोठा मुद्दाराज्य शासनाचा कानाडोळा, औद्योगिक विकास रखडला

मोरेश्वर मानापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उद्योगाला चालना देण्याचे शासनाचे धोरण आहे. पण खुद्द शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे राज्यातील एमआयडीसीतील उद्योगांचा विकास खोळंबला आहे. बंद पडलेल्या कारखान्यांमध्ये नवउद्यमींना उद्योग सुरू करण्यास अडचणी येत आहे. रेडिरेकनरवर आकारण्यात येणारे मुद्रांक शुल्क आणि कॅपिटल गेन टॅक्स मोठा अडथळा बनला आहे. नवउद्यमींना संधी देण्यासाठी शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत उद्योजकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.

राज्यात पाच हजारांपेक्षा जास्त उद्योग बंदफेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ विदर्भचे सचिव सीए मिलिंद कानडे यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्यात कारखाने मुख्यत्वे एमआयडीसीच्या औद्योगिक क्षेत्रात उभारले जातात. कारखानदारांना लीजवर एमआयडीसीचे भूखंड उपलब्ध करून देण्यात येतात. महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अधिनियम २०१३ द्वारे बाजारभाव किंवा रेडिरेकनरच्या दरानुसार लीजच्या हस्तांतरणावर मुद्रांक शुल्क भरावा लागतो. केंद्र सरकारच्या आयकर कायदा-१९६१ नुसार लीजच्या हस्तांतरणावर कॅपिटल गेन टॅक्स लागतो. हा टॅक्स बाजारभाव आणि रेडिरेकनरचे दर या दोघांपैकी जो जास्त असेल त्यावर आकारला जातो. लीज हस्तांतरण जर रेडिरेकनरच्या दरापेक्षा कमी भावात झाले तर खरेदी करणारा व विक्री करणारा या दोघांनाही आयकर भरावा लागतो. राज्यात पाच हजारांपेक्षा जास्त आणि बुटीबोरी औद्योगिक परिसरात ५६४ भूखंडावरील कारखाने अनेक वर्षांपासून बंद पडलेले आहेत आणि रेडिरेकनरच्या अवाजवी दरामुळे त्यांचे हस्तांतरण होऊ शकत नाही. नवउद्यमींची इच्छा असूनही तो खरेदी करू शकत नाही.

रेडिरेकनरचा शासनाच्या अभिलेखात उल्लेख नाहीरेडिरेकनरचे दर कशाच्या आधारावर निश्चित करण्यात आले आहे. या संदर्भात माहितीच्या अधिकारात सहायक संचालक, नगररचना, मूल्यांकन प्रादेशिक कार्यालय, नागपूर आणि सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, नागपूर शहर या दोन्ही कार्यालयाच्या अभिलेखात याबाबत कोणताही पुरावा उपलब्ध नाही.

...तर राज्यात उद्योगांची होणार भरभराटकानडे म्हणाले, नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी औद्योगिक क्षेत्रासाठी रेडिरेकनरचे ६६०० रुपये प्रति चौरस मीटर, एमआयडीसीचे दर १४५० रुपये प्रति चौरस मीटर आणि बाजारभाव १६०० रुपये चौरस मीटर आहे. बाजारभाव आणि रेडिरेकनरच्या दरात प्रचंड तफावत आहे. लीज हस्तांतरणाच्या वेळेस कारखानदार बाजारभावाच्या ६५ टक्के आणि लीजचे हक्क खरेदी करणाऱ्याला ३० टक्के आयकर भरावा लागतो. म्हणजेच दोघांना मिळून विक्री किमतीच्या ९५ टक्के आयकर भरावा लागतो. त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण एमआयडीसी औद्योगक क्षेत्रात भूखंडाच्या लीजचे हस्तांतरण थांबले आहे. बंद उद्योगांमुळे कारखानदारांवर कर्जाचा बोझा वाढला आहे. या संदर्भात असोसिएशनने शासनाकडे अनेकदा पत्रव्यवहार केला आहे. पण शासनाने याकडे नेहमीच कानाडोळा केला आहे. एमआयडीसीमधील औद्योगिक भूखंडाच्या हस्तांतरणावर लागणारे मुद्रांक शुल्क एमआयडीसीच्या औद्योगिक दराने आकारल्यास राज्यात उद्योगांची भरभराट होईल, असे कानडे यांनी स्पष्ट केले.

असामाजिक तत्त्वांचा वावरराज्यातील एमआयडीसीतील बंद असलेल्या कारखान्यांच्या जागेवर असामाजिक तत्त्वांचा वावर, चोरी आणि अवैध कामे वाढली आहेत. त्याठिकाणी झाडे वाढल्यामुळे आगीच्या घटना निरंतर होत आहेत. त्याचा फटका लगतच्या कारखान्यांना बसत आहे. त्यामुळे शासनाने बंद कारखाने विक्रीसाठी नवे धोरण आणावे, अशी मागणी कानडे यांनी केली. 

टॅग्स :MIDCएमआयडीसी