शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दिवसाढवळ्या भाईगिरी; चाकूच्या धाकावर कॅफेमालकाचे अपहरण करत मारहाण

By योगेश पांडे | Updated: February 27, 2024 19:05 IST

या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

नागपूर : उपराजधानीत गुंडांवर कुठलाही वचक राहिलेला नसून अगदी दिवसाढवळ्या भर रस्त्यावरदेखील राडा करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मुलीशी बोलण्याच्या शुल्लक मुद्द्यावरून आठ गुंडांनी चाकूच्या धाकावर एका कॅफेमालकाचे भर दिवसा अपहरण केले. त्यानंतर त्याला निर्जन जागी नेत बेदम मारहाण केली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

संतोष नरेश जोगेकर (२५) असे तक्रारदाराचे नाव आहे. हिंगणा टी पॉईंट परिसरात त्याचा कॅफे आहे. सोमवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास तो कॅफेमध्येच असताना तीन तरुण आले. अगोदर त्यांनी बर्थडे पार्टीसाठी कॅफे हवा आहे अशी विचारणा केली व त्यानंतर तोंडावर रुमाल बांधून एक तरुण आला व संतोषला त्याचे नाव विचारले. त्यानंतर अचानक चौघांनीही शिवीगाळ करत संतोषला मारहाण सुरू केली. तरुणाने रुमाल काढला तेव्हा तो हर्षल ब्राह्मणे (२५, दाते ले आऊट) असल्याचे संतोषने ओळखले. हर्षलने खिशातून चाकू काढत त्या धाकावर संतोषला फरफटत कॅफेबाहेर आणले. त्याच्या हातात चाकू असल्याने इतर कुणी वाचवायला समोर आले नाही. हर्षलचे आणखी पाच साथीदार बाहेर उभे होते. आरोपींनी संतोषला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसविले व अजनी रेल्वे कॉलनीजवळील मैदानावर नेले. तेथे एका मुलीला किती वेळा भेटलास अशी विचारणा हर्षलने केली. यानंतर हर्षलने परत संतोषला मारहाण केली. सायंकाळी दोन आरोपींनी मोटारसायकलवरच संतोषला परत कॅफेजवळ सोडले. या प्रकारामुळे संतोष हादरला. त्याने राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी हर्षल व त्याच्या सात साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :nagpurनागपूर