शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

नागपूर हायकोर्टाच्या कामकाजाचे जुलैतील नियोजन जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 20:27 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील कामकाजाचे जुलैतील नियोजन जाहीर करण्यात आले आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठातील कामकाजाचे जुलैतील नियोजन जाहीर करण्यात आले आहे.नवीन नियोजनानुसार २ जुलै रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत न्या. मुरलीधर गिरटकर अटकपूर्व जामीन अर्ज, न्या. अविनाश घरोटे नियमित जामीन अर्ज, ३ जुलै रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत न्या. रवी देशपांडे व न्या. अमित बोरकर यांचे द्विसदस्यीय न्यायपीठ आणि न्या. मनीष पितळे यांचे एकल न्यायपीठ आपापल्या अधिकारातील तातडीची व अ‍ॅडमिशन श्रेणीतील दिवाणी प्रकरणे तर, दुपारी २ ते ३.३० व ३.४५ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत न्या. अतुल चांदुरकर व न्या. अनिल किलोर यांचे द्विसदस्यीय न्यायपीठ आणि न्या. स्वप्ना जोशी यांचे एकल न्यायपीठ आपापल्या अधिकारातील तातडीची व अ‍ॅडमिशन श्रेणीतील फौजदारी प्रकरणे ऐकतील.येथून पुढे सकाळी १०.३० ते दुपारी १.३० आणि दुपारी २.३० ते ४.३० वाजेपर्यंत कामकाज होईल. या वेळेत ६ जुलै व ९ जुलै रोजी न्या. सुनील शुक्रे व न्या. श्रीराम मोडक यांचे द्विसदस्यीय न्यायपीठ आणि न्या. रोहित देव यांचे एकल न्यायपीठ आपापल्या श्रेणीतील तातडीची व अ‍ॅडमिशन श्रेणीतील दिवाणी प्रकरणे, न्या. नितीन सांबरे तातडीचे नियमित जामीन अर्ज, ७ जुलै व १० जुलै रोजी न्या. झेड. ए. हक व न्या. नितीन सूर्यवंशी यांचे द्विसदस्यीय न्यायपीठ आणि न्या. विनय जोशी यांचे एकल न्यायपीठ आपापल्या अधिकारातील तातडीची व अ‍ॅडमिशन श्रेणीतील फौजदारी प्रकरणे, न्या. पुष्पा गणेडीवाला तातडीचे अटकपूर्व जामीन अर्ज, १३ जुलै व १६ जुलै रोजी न्या. रवी देशपांडे व न्या. अनिल किलोर यांचे द्विसदस्यीय न्यायपीठ आणि न्या. मनीष पितळे यांचे एकल न्यायपीठ तातडीची व अ‍ॅडमिशन श्रेणीतील दिवाणी प्रकरणे, न्या. अविनाश घरोटे तातडीचे नियमित जामीन अर्ज, १४ व १७ जुलै रोजी न्या. अतुल चांदुरकर व न्या. अमित बोरकर यांचे द्विसदस्यीय न्यायपीठ आणि न्या. स्वप्ना जोशी यांचे एकल न्यायपीठ तातडीची व अ‍ॅडमिशन श्रेणीतील फौजदारी प्रकरणे, न्या. मुरलीधर गिरटकर तातडीचे अटकपूर्व जामीन अर्ज, २० जुलै व २३ जुलै रोजी न्या. सुनील शुक्रे व न्या. नितीन सूर्यवंशी यांचे द्विसदस्यीय न्यायपीठ आणि न्या. रोहित देव यांचे एकल न्यायपीठ तातडीचे व अ‍ॅडमिशन श्रेणीतील दिवाणी प्रकरणे, न्या. विनय जोशी तातडीचे नियमित जामीन अर्ज, २१ जुलै व २४ जुलै रोजी न्या. झेड. ए. हक व न्या. श्रीराम मोडक यांचे द्विसदस्यीय न्यायपीठ आणि न्या. नितीन सांबरे यांचे एकल न्यायपीठ तातडीची व अ‍ॅडमिशन श्रेणीतील फौजदारी प्रकरणे तर, न्या. पुष्पा गणेडीवाला तातडीचे अटकपूर्व जामीन अर्ज ऐकतील.जिल्हा न्यायालयात एक सत्रात कामकाजकोरोना संक्रमणामुळे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नागपूर मुख्यालयातील सर्व न्यायालयांमध्ये १ ते २० जुलैपर्यंत केवळ एक सत्रात कामकाज केले जाणार आहे. या कालावधीतील कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी १ ते ४ या वेळेत केवळ अत्यंत तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी घेतली जाणार आहे. न्यायालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कामकाज सुरू होण्याच्या अर्धा तास आधी यावे लागेल व कामकाज संपल्यानंतर अर्धा तास जास्त न्यायालयात थांबावे लागेल. न्यायाधीशांनी जास्तीत जास्त कामकाज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करावे व त्यासाठी वकिलांना प्रोत्साहन द्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. मेहरे यांनी परिपत्रक जारी केले आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर