शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्सनंतर आता नागपूर पोलिसांचा ट्रक व जड वाहनांवर हंटर, शहरात सकाळी ९ ते रात्री १० ‘नो एन्ट्री’

By योगेश पांडे | Updated: September 4, 2025 23:11 IST

बाहेरून येणाऱ्या ट्रक्सला आऊटर रिंग रोड अनिवार्य , वाहतूक पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी ही अधिसूचना जारी केली आहे. ८ सप्टेंबरपासून ही नियमावली महिन्याभरासाठी लागू असेल.

- योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांची संख्या आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी आता शहरात जड वाहनांच्या हालचालींवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, यानुसार सकाळी ९ ते रात्री १० या कालावधीत जड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याशिवाय एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणाऱ्या ट्रक्सला आऊटर रिंगरोडचाच वापर करावा लागणार आहे. त्यांना शहरात येता येणार नाही. या निर्बंधांमुळे वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

वाहतूक पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी ही अधिसूचना जारी केली आहे. ८ सप्टेंबरपासून ही नियमावली महिन्याभरासाठी लागू असेल. अधिसूचनेनुसार, मोठे ट्रक, ट्रेलर, डंपर, कंटेनर आदी वाहनांना शहराच्या मुख्य रस्त्यांवर रात्री १० ते सकाळी सहा या वेळेतच प्रवेश करता येईल. याव्यतिरिक्त त्यांना प्रवेश करता येणार नाही. इतवारी, कळमना, एफसीआय गोदाम, रेल्वे मालधक्का, संत्रा मार्केट, लाल गोदाम, गांधीबाग येथे दररोज जड वाहनांनी मोठ्या प्रमाणावर माल येतो. मात्र आता या जड वाहनांना विशिष्ट मार्गाचा वापर करून ठराविक वेळेतच जाता येणार आहे.

नियम तोडला तर १० हजारांचा दंडनागपूर देशाच्या केंद्रस्थानी असल्याने विविध राज्यांतून दुसऱ्या राज्यांत जाणारे ट्रक्स व इतर जड वाहने शहरातून जातात. मात्र अशा ट्रक्सला आता थेट आऊटर रिंग रोडने जावे लागणार आहे. त्यांना शहरात प्रवेशबंदी राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर साडेसातशे ते दहा हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल. पोलिस यंत्रणेला विशेष पथके तयार करून तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.

जड वाहनांमुळे पाच वर्षांत ४५७ लोकांचा मृत्यूजड वाहनांमुळे शहरात अनेक अपघात होतात. मागील पाच वर्षांत शहरात जड वाहनांमुळे ४२२ प्राणांतिक अपघात झाले व त्यात ४५७ लोकांचा मृत्यू झाला. तर साडेपाचशेहून अधिक लोक गंभीर जखमी झाले. नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

खालील जड वाहनांनाच परवानगी - केन्द्र शासन व राज्य शासन, नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हा परिषद किंवा इतर महामंडळाच्या मालकीची शासकीय कामासाठी फिरणारी वाहने.- अग्निशमन दल, सैन्य दल तसेच केन्द्र व राज्य शासनाचे पोलीस दलाचे जडवाहन.- दूध, पेट्रोल, डिझेल, केरोसीन, गॅस यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी जड वाहने.- प्रवासी वाहतुक करणारी शासकिय, सार्वजनिक वाहने.

या सूचनांचे पालन अनिवार्य- शासकीय कामात गुंतलेल्या जड वाहनांच्या चालकावर संबंधीत कार्यालयीन प्रमुखाचे मुळ स्वरुपातीलप्रमाणपत्र बाळगणे तसेच वाहनासमोर ‘ऑन गव्हर्नमेंट ड्युटी’ लिहिणे.- शहराच्या हद्दीत ३० किलोमीटर प्रति तास वेगाची मर्यादा

टॅग्स :nagpurनागपूरTrafficवाहतूक कोंडी