शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात १,२८० अतिदक्षता खाटांचे रुग्णालय सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 22:38 IST

कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे अशा रुग्णांच्या सध्या उपचारासाठी असलेल्या सुविधांमध्ये वाढ करून अतिदक्षता कक्ष, प्रत्येक बेडवर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदी सुविधा या उपचारासाठी अत्यंत आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या विद्यमान व्यवस्थेत बदल करून केवळ एका महिन्यात सुसज्ज ‘कोविड-१९’ हॉस्पिटल तयार करून १,२८० रुग्णांवर उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाचा पुढाकार : कोरोनाबाधित रुग्णांसाठी एका महिन्यात तयार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे अशा रुग्णांच्या सध्या उपचारासाठी असलेल्या सुविधांमध्ये वाढ करून अतिदक्षता कक्ष, प्रत्येक बेडवर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदी सुविधा या उपचारासाठी अत्यंत आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत असलेल्या विद्यमान व्यवस्थेत बदल करून केवळ एका महिन्यात सुसज्ज ‘कोविड-१९’ हॉस्पिटल तयार करून १,२८० रुग्णांवर उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने विशिष्ट कोविड रुग्णालय, कोविड आरोग्य केंद्र व कोविड दक्षता केंद्रे उभी केली आहेत. याशिवाय कोविड-१९ संशयितांकरिता विलगीकरण केंद्रे उभारण्यात आलेली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सैनिक, सचिव अजित सगणे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपुरात १,२८० रुग्णांकरिता दोन स्वतंत्र कोविड हॉस्पिटल सुरू झाले आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील ट्रॉमा केअर सेंटर या नवीन इमारतीमध्ये एकूण २६२ खाटांची सोय करण्यात आली आहे. २६२ खाटापैकी १२९ खाटांचे मेडिकल गॅस पाईपलाईन व इतर आनुषंगिक उपकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत १५० तासांच्या आत पूर्ण करण्यात आले आहे. तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील २०१६ मध्ये बांधून झालेली पाच मजली सर्जिकल कॉम्प्लेक्स इमारत होती. या इमारतीत अस्तित्वातील १३ वॉर्डांचे आधुनिकीकरण व नवीन ९ वॉर्डांसह एकूण २२ वॉर्ड कोविड-१९ च्या ५६८ गंभीर रुग्णांसाठी केवळ २० दिवसांत सुसज्ज केले आहेत.कोविड हॉस्पिटलची निर्मिती करताना आवश्यक पार्टिशन्ससह प्रामुख्याने मेडिकल गॅस पाईपलाईन, आॅक्सिजन सप्लाय उपकरणे व आॅक्सिजन बँक प्रस्थापित करण्याकरिता शेडची उभारणी करणे व सर्व अत्याधुनिक उपकरणे स्थापित करणे, प्रसाधनगृहे तयार करण्यात आली आहेत. ५६८ कोविड-१९ रुग्णांना अतिदक्षतेची सेवा उपलब्ध असणारे दक्षिण-मध्य आशियातील सर्वात मोठे कोविड रुग्णालय सज्ज झाले आहे. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर परिसरात पंतप्रधान आरोग्य योजना अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत १२० गंभीर रुग्णांकरिता अतिदक्षता विभाग आॅक्सिजन बँक व इतर उपकरणे स्थापित करण्याकरितादेखील शेडसह सोय व परिसरातील इतर १० वॉर्डांना जोडण्याकरिता अतिदक्षता विभागापासून स्वतंत्र पाथ-वे तयार करण्यात आला. ही सर्व कामे १५ दिवसात पूर्ण करण्यात आली आहेत. याच परिसरातील उपलब्ध असलेल्या एकूण वॉर्डांपैकी ८ वॉर्डांचे नूतनीकरण करण्यात आले असून ३३० कोविड रुग्णांसाठी हे वॉर्ड पूर्ण क्षमतेने वापरण्यात येणार आहेत.कोविड हॉस्पिटल तयार करताना वॉर्डमध्ये सारी आजाराचे रुग्ण तर काही ठिकाणी कोविड-१९ चे रुग्णदेखील अ‍ॅडमिट असल्यामुळे कंत्राटदाराचे मजूर पळून जात होते. पेशंट असलेल्या वॉर्डमध्ये सदर मजूर काम करीत असल्याने आवश्यक दक्षता घेताना रुग्णांनाही त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात आली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल