शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur Gram Panchayat Election Result : नरखेडमध्ये भाजपाची मुसंडी, राष्ट्रवादीचा विजयरथ रोखला!

By जितेंद्र ढवळे | Updated: November 6, 2023 16:15 IST

खरसोलीत अजित पवार गटानेही खाते उघडले 

नागपूर : राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते आ.अनिल देशमुख यांचा बालेकिल्ला असलेल्या नरखेड तालुक्यात ग्रा. पं. निवडणुकीच्या निकालात भाजपाने जोरदार मुसंडी घेतली आहे. भाजपाचे  विधानसभा प्रमुख चरणसिंग ठाकूर यांनी नरखेड तालुक्याची निवडणुक डोक्यावर घेतली होती. तालुक्यात २९ ग्रा.पं.च्या निवडणुका झाल्या. यात जाहीर झालेल्या निकालानुसार घोगरा ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपाचे एकनाथ मानकर विजयी झाले. बानोरचंद्र ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपाच्या मंगला वसंता चौधरी, गोधणी गायमुख ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपच्या मीना सुरेशसिंग सूर्यवंशी विजयी झाल्या. 

खापरी (केने) ग्रा.पं.च्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे मनीष विजय केने, मोहगाव (भदाडे) ग्रा.पं.च्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या निर्मला जयपाल चकनापूरे, विवरा ग्रा.पं.च्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे धनराज वसंत डवरे विजयी झाले. मोगरा ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपाच्या मीनाक्षी उमेश्वर मडके , नारसिंगी ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपाच्या नलुबाई प्रवीण काकडे, भारसिंगी ग्रा.पं.च्या सरपंचपदी स्थानिक आघाडीच्या शारदा रवींद्र धवराळ विजयी झाल्या. 

मोहदी (धोत्रा) ग्रा.पं.च्या सरपंचपदी राष्ट्रवादीचे राजू नाखले, जुनोना (फुके) ग्रा.पं.च्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या प्रभा ओमप्रकाश गोतमारे विजयी झाल्या. जुनोना (फुके) भाजप नेते परिणय फुके यांचे गाव आहे. मोहदी दळवी येथे अपक्ष उमदेवार राहुल साहेबराव दळवी यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत बाजी मारली. तर खरसोली ग्रा.पं.मध्ये अजित पवार गटाच्या नीलिमा नरेश अरसडे विजयी झाल्या आहेत. नरेश अरसडे हे अजित पवार गटाचे काटोल-नरखेड विधानसभा मतदार संघाचे प्रमुख आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकnagpurनागपूर