शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

नागपुरचा गँगस्टर सुमित ठाकूर अजूनही फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 00:47 IST

गँगस्टर पिन्नू पांडेवर गोळीबार केल्याप्रकरणी गँगस्टर सुमित ठाकूर अजूनही गिट्टीखदान पोलिसांच्या हाती लागलेला नाही. परंतु गोळीबर करणारा सुमितचा साथीदार उर्जेर ऊर्फ उज्जू खालीद खान याला अटक करण्यात आली. उज्जूने पिन्नूवर गोळी चालवण्याची कबुली दिली आहे. यादरम्यान पिन्नू पांडे टोळीद्वारे गोळीबाराचा बदला घेण्याच्या शक्यतेने पेन्शननगरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

ठळक मुद्देगोळीबार करणाऱ्यास अटकबदला घेण्याच्या तयारीत पिन्नूपेन्शननगरात दहशतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गँगस्टर पिन्नू पांडेवर गोळीबार केल्याप्रकरणी गँगस्टर सुमित ठाकूर अजूनही गिट्टीखदान पोलिसांच्या हाती लागलेला नाही. परंतु गोळीबर करणारा सुमितचा साथीदार उर्जेर ऊर्फ उज्जू खालीद खान याला अटक करण्यात आली. उज्जूने पिन्नूवर गोळी चालवण्याची कबुली दिली आहे. यादरम्यान पिन्नू पांडे टोळीद्वारे गोळीबाराचा बदला घेण्याच्या शक्यतेने पेन्शननगरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.मंगळवारी सायंकाळी गिट्टीखदान पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या जखमी पेन्शननगर चौकात सुमित ठाकूर गँगच्या सदस्यंनी २७ वर्षीय गुन्हेगार कुलदीप ऊर्फ पिन्नू पांडेवर गोळीबार केला होता. चालत्या बाईकवरून गोळी चालवल्याने निशाणा चुकला आणि पिन्नूच्या गुडघ्याला गोळी लागली. त्याने जवळच्याच एका दुकानात लपून आपला जीव वाचवला होता. या गोळीबारात मोहनलाल धुरिया (५४) रा. मिसाळ ले-आऊट आणि एक अल्पवयीनही जखमी झाला होता. सीसीटीव्हीच्या आधारावर पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहे. प्राथमिक चौकशीत पोलिसांना सुमित ठाकूर गँगवर संशय आला होता. पिन्नूने सुमित ठाकूर, नौशाद, इरफान गोली, पिंकू तिवारी, लाला पांडे आणि मोन्या शिंदेने गोळीबार केल्याचे सांगितले होते. पोलीस तपसात सुमितचा साथीदार उर्जेर ऊर्फ उज्जूने गोळी चालवल्याचे आढळून आले. पोलीस तेव्हापासून उज्जूचा शोध घेत होते. बुधवरी तो गिट्टीखदान पोलिसांच्या हाती लागला. सूत्राुसार त्याने गोळीबार केल्याचे कबूल केले आहे. तो आपल्या साथीदारासह बाईकवर बसून आला होता. त्यानेच मागे बसून पिन्नूवर गोळ्या घातल्या. दिवसभर विचारपूस केल्यानंतर सायंकाळी त्याला अटक करण्यात आली.पेन्शननगर पोलीस मुख्यालयाजवळ आहे. या परिसरात राहणारे बहुतांश नागरिक पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी आहेत. यानंतरही या परिसरात अवैध धंदे सर्रास सुरू आहेत. जुगार अड्डा, सट्टा, मटका, अवैध दारू विक्रीचे अनेक अड्डे आहेत.पिन्नू पांडे हा सराईत गुन्हेगार आहे. तो दीड महिन्यांपूर्वीच जामिनावर सुटून आला. बाहेर आल्यापासून तो दिवसभर पेन्शननगर परिसरातच राहतो. पेन्शननगर चौकातच त्याचा अड्डा होता. या चौकात नेहमी वर्दळ असते. यानंतरही आरोपींनी चालत्या बाईकवरून पिन्नूवर हल्ला करण्याचे धाडस केले. सूत्रानुसार गोळीबरीमुळे पिन्नू गँगचे सदस्य अतिशय संतापले आहेत. सुमित त्यांच्यासाठी धोका वाटू लगला आहे. त्याचा बदला घेण्याची ते तयारी करीत असल्याचे सांगितले जाते.जखमींची नावेही माहीत नाहीया प्रकरणात इतर दोघे जखमी झाले परंतु त्यांची नावेही गिटटीखदान पोलिसांकडे नाही. त्यामुळे पोलीस या प्रकरणाला किती गांभीर्याने हाताळत आहे, हे दिसून येते. गिट्टीखदान पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे पिन्नू शिवाय दुसऱ्या जखमींची नावे नव्हती. जखमी मोहनलाल धुरिया याचे नाव लगेच माहीत झाले होते. त्यांनी पोलीस सूचना केंद्रालाही याबाबत माहिती दिली नाही.

 

टॅग्स :Firingगोळीबारnagpurनागपूर