शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या जीवाशी होतोय खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 23:40 IST

College Students Admission, Nagpur News प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया संपल्यानंतर आता महाविद्यालयांमध्ये द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेशाची लगबग सुरू आहे. काही महाविद्यालये सोडली तर बहुतांश ठिकाणी ऑनलाईन प्रवेशाची कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयांत बोलविले जात आहे व त्यामुळे प्रवेशासाठी गर्दी होत आहे. ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा फज्जा उडत असल्याने विद्यार्थ्यांना संसर्ग होण्याचा धोका आहे.

ठळक मुद्देऑनलाईन प्रवेशाची व्यवस्था नाही : ‘कोरोना’च्या नियमांचे खुलेआम उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रथम वर्षाची प्रवेशप्रक्रिया संपल्यानंतर आता महाविद्यालयांमध्ये द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेशाची लगबग सुरू आहे. काही महाविद्यालये सोडली तर बहुतांश ठिकाणी ऑनलाईन प्रवेशाची कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयांत बोलविले जात आहे व त्यामुळे प्रवेशासाठी गर्दी होत आहे. ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा फज्जा उडत असल्याने विद्यार्थ्यांना संसर्ग होण्याचा धोका आहे. खुलेआम महाविद्यालयांकडून ‘कोरोना’च्या नियमांचे उल्लंघन होत असताना प्रशासनाने मौन साधले आहे.केंद्र व राज्य शासनाने कोरोना संक्रमणापासून लोकांचा जीव वाचविण्यासाठी गाईडलाईन जारी केल्या आहेत. मात्र अनेक महाविद्यालयांत त्यांचे पालनच होत नसल्याचे चित्र आहे. कॉंग्रेसनगर स्थित धनवटे नॅशनल कॉलेज येथे गुरुवारी प्रचंड गर्दी होती. विद्यार्थ्यांना दाटीवाटीने उभे राहावे लागत होते. सकाळी १० वाजल्यापासून विद्यार्थ्यांची लांब रांग दिसून आली. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला तर त्याला जबाबदार कोण असेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.महाविद्यालयांत प्रवेशासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी येणार आहेत याची माहिती महाविद्यालय प्रशासनाला अगोदरपासूनच होती. तरीदेखील काहीच काळजी घेण्यात आली नाही.शहरातील इतरही काही महाविद्यालयांत असेच चित्र असल्याची माहिती सूत्रांनी दिली.महाविद्यालयाचा दावा, १०० विद्यार्थ्यांना बोलविलेयासंदर्भात धनवटे नॅशनल कॉलेजच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी केवळ १०० विद्यार्थ्यांनाच बोलविले व ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चेदेखील पालन करण्यात आले असा दावा केला. मात्र ‘लोकमत’कडे असलेल्या छायाचित्रांत वेगळेच चित्र दिसून येत आहे. कोणत्या १०० विद्यार्थ्यांना बोलविण्यात आले हे स्पष्ट होऊ शकले नाही. इतर महविद्यालयांना विचारणा केली असता त्यांनी विद्यापीठाकडे अंगुलीनिर्देश केला. विद्यापीठाने प्रवेशप्रक्रियेची स्पष्ट माहिती दिलेली नाही. प्रवेशाची मुदत संपण्याच्या काही दिवसअगोदर माहिती पुरविण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी