शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात शिवसेनेचे चार वर्षात चार संपर्कप्रमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 11:25 IST

शिवसेनेने गेल्या चार वर्षात नागपूर व पूर्व विदर्भासाठी चार संपर्क प्रमुख बदलले आहे. नवा संपर्क प्रमुख देताना संबंधित नेता आता स्थायी स्वरुपात या भागाकडे शिवसेना वाढविण्यासाठी विशेष लक्ष देईल, असा दावा केला जात होता. मात्र, चार सहा महिन्यांतच संबंधिताला संपर्कक्षेत्र सोडावे लागले.

ठळक मुद्देगजानन कीर्तीकर सांभाळणार पूर्व विदर्भशिवसेना कार्यकर्त्यांची नाराजी दूर होईल का ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिवसेनेने गेल्या चार वर्षात नागपूर व पूर्व विदर्भासाठी चार संपर्क प्रमुख बदलले आहे. नवा संपर्क प्रमुख देताना संबंधित नेता आता स्थायी स्वरुपात या भागाकडे शिवसेना वाढविण्यासाठी विशेष लक्ष देईल, असा दावा केला जात होता. मात्र, चार सहा महिन्यांतच संबंधिताला संपर्कक्षेत्र सोडावे लागले. आता खासदार गजानन कीर्तीकर यांच्याकडे पूर्व विदभार्साठी संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.शिवसेनेचे मुंबईतील नेते विदर्भाकडे विशेष लक्ष देत नाहीत, रिक्त पदे त्वरित भरत नाहीत, अशी येथील कार्यकर्त्यांची नाराजी आहे. गेल्या चार वर्षातील पूर्व विदर्भाचा घटनाक्रम पाहता एकाही संपर्क प्रमुखाला येथे स्थिरावता आलेले नाही. पूर्व विदर्भात नागपूरसह चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख विनायक राऊत होते. ते रायगडमधून खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर त्यांनी संपर्क प्रमुखपद सोडले. त्यांच्या जागी आमदार अनिल परब यांची नियुक्ती केली होती. परब यांच्यावर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपविल्यानंतर आ. तानाजी सावंत यांच्यावर धुरा देण्यात आली. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठा मेळावा घेत सावंत यांनी रणशिंग फुकले, मात्र प्रत्यक्ष निवडणुकीच्यावेळी ते नागपुरात फिरकलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कार्यकर्त्यांची नाराजी वाढली होती. त्यांना बदलून काही महिन्यांपूर्वीच अनुभवी नेते परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती.रावते यांनी या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जिल्ह्यांचे दौरे केले. पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या.जवळचा दूरचा भेदभाव न करता चुकेल त्याची कानउघाडणीही केली. मात्र, रावते हे मंत्री असल्यामुळे त्यांच्यावर इतरही कामांचा भार होता. आगामी निवडणुका विचारात घेता आता पक्षाने रावते यांच्यावर कोल्हापूर, इचलकरंजी, सातारा व सांगलीची संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सोपविली व पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांसाठी कीर्तीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कीर्तीकरांची नियुक्तीगेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप-सेना युती लढली. विधानसभेत दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. सध्या शिवसेनेचे पूर्व विदर्भात एक खासदार व एकच आमदार आहे. आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा सेनेकडून वारंवार केली जात आहे.या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भात संघटन मजबूत करण्यासाठी कीर्तीकर यांच्यावर धुरा सोपविण्यात आल्याचे पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. कीर्तीकर हे यापूर्वी १९९४ पासून ९ वर्षे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख होते. त्यांच्या काळात नागपूर जिल्हा परिषदेत दोन सदस्य असतानाही शिवसेनेला अध्यक्षपद मिळाले होते. लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे पक्षाला त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.

नागपूर शहर कार्यकारिणी कुठे अडली ?गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेखर सावरबांधे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून आजवर पक्षाची नवी शहर कार्यकारिणी स्थापन झालेली नाही. सावरबांधे यांच्यानंततर सतीश हरडे व काही महिन्यांपूर्वी माजी खासदार प्रकाश जाधव नागपूर शहर अध्यक्ष झाले. मात्र, कुणीही कार्यकारिणी देऊ शकले नाही. विशेष म्हणजे पक्ष विना कार्यकारिणीने महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे गेला व दारुण पराभव पहावा लागला. मुंबईत बसणाऱ्या नेत्यांना पदे हवी आहेत, तर नागपुरात राबणाऱ्या कार्यकर्त्यांना का नाही, असा सवाल कार्यकर्ते करू लागले आहेत. किर्तीकर हे पुढच्या आठवड्यात नागपुरात येत असून पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. चार वर्षात झाले नाही ते किर्तीकर तरी करतील, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेना