शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
4
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
5
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
6
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
7
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
8
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
9
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
10
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
11
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
12
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
13
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
14
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
15
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
16
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
17
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
18
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
19
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
20
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत

नागपूर फ्लाइंग क्लबला प्रशिक्षणाची परवानगी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:12 IST

वसीम कुरैशी नागपूर : चार वर्षे तीन महिन्यांनंतरही नागपूर फ्लाइंग क्लबची प्रशिक्षण उड्डाणे सुरू झालेली नाहीत. प्रशासकीय प्रक्रियेची गती ...

वसीम कुरैशी

नागपूर : चार वर्षे तीन महिन्यांनंतरही नागपूर फ्लाइंग क्लबची प्रशिक्षण उड्डाणे सुरू झालेली नाहीत. प्रशासकीय प्रक्रियेची गती संथ असल्यामुळे आतापर्यंत प्रशिक्षण विमाने संचालन करण्याची परवानगी (एफटीओ परवाना) मिळालेली नाही. क्लब १७ जून २०१७ पासून बंद आहे, हे विशेष.

विमानाचे इंजिन बदलविण्याची प्रक्रिया १६ जून २०१७ पासूनच सुरू झाली. चार वर्षांनंतर अजूनही एक विमानाची दुरुस्ती झालेली नाही. जवळपास एका वर्षापूर्वी तीन तयार विमानांचे एअरवर्दिनेस सर्टिफिकेट (एआरसी) क्बलला मिळाले आहे. परवाना मिळण्यासाठी क्लबमध्ये उडण्यासाठी तयार विमाने आणि कर्मचारी आवश्यक असतात. विमानांना तयार करण्यासह कर्मचाऱ्यांची भरतीही सुरू करण्यात आली आहे.

एक महिन्यापूर्वी डेप्टी चीफ फ्लाइंग इन्स्ट्रक्टरसह अन्य पदांवर नियुक्तीनंतर फ्लाइट ट्रेनिंग ऑर्गनायझेशनकरिता (एफटीओ परवाना) नागरी उड्डयन संचालनालयाकडे (डीजीसीए) प्रस्ताव दिला आहे.

देशात वैमानिकांची कमतरता

देशातील काही सरकारी फ्लाइंग क्लबमध्ये नागपूरचा एक क्लब आहे. अन्यच्या तुलनेत येथे प्रशिक्षण उड्डाणांसाठी चांगले वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ, जागतिकस्तरीय एमआरओसह फ्लाइंग प्रशिक्षण येथील एव्हिएशनला पूर्णत: प्रदान करते. राजकीय स्तरावर प्रयत्न झाल्यास हा क्लब लवकरच सुरू होऊ शकतो. संपूर्ण जगात वैमानिकांची कमतरता आहे. नागपूर फ्लाइंग क्लबला ही कमतरता जाणवत आहे. या क्लबद्वारे अनेक युवकांना करिअर बनविता येऊ शकते. क्लब सुरू न झाल्याने चार वर्षांपूर्वी येथे प्रवेश घेणारे काही प्रशिक्षणार्थी या क्षेत्रात करिअर बनवू शकले नाहीत.

परवान्यासाठी तयारी पूर्ण

एफटीओ परवान्यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली आहे. मान्यतेसाठी डीजीसीएकडे प्रस्ताव पाठविला आहे. डीजीसीए टीमच्या दौऱ्यानंतरच परवानगीची प्रक्रिया पुढे वाढणार आहे. क्लबच्या चार विमानांपैकी तीन तयार असून, एकामध्ये थोडीफार दुरुस्ती करण्यात येणार आहे.

-मिलिंद साळवे, प्रभारी व्यवस्थापकीय संचालक, नागपूर फ्लाइंग क्लब