शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: आता पूर्णवत झाले विमानांचे वेळापत्रक, ‘डीजीसीए’ने हटविले प्रतिबंध

By मोरेश्वर मानापुरे | Updated: May 20, 2024 20:57 IST

Nagpur News: नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची देखभाल व दुरुस्तीसाठी (रिकार्पेटिंग) नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) सूचनेनुसार दैनंदिन विमानतळाच्या वेळापत्रकात सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत विमानाची उड्डाणे रद्द करण्यात आली होती.

- मोरेश्वर मानापुरेनागपूर - नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची देखभाल व दुरुस्तीसाठी (रिकार्पेटिंग) नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) सूचनेनुसार दैनंदिन विमानतळाच्या वेळापत्रकात सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत विमानाची उड्डाणे रद्द करण्यात आली होती. या निर्णयाला दोन महिने झाली. धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम अद्याप काम सुरू न झाल्याने विमानाचे वेळापत्रक पूर्वीप्रमाणेच करण्यात आले असून त्यानुसार आता उड्डाणे दुपारीही होतील.

धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम भारतीय विमानतळ प्राधिकरण करणार आहे. त्यांनी निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. पण कंत्राटदार अजूनही नियुक्त झालेला नाही. काम केव्हापासून सुरू होणार, याची माहिती एएआयने विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडला (एमआयएल) दिल्यानंतरच विमानाच्या वेळापत्रकात पुन्हा बदल होतील, असे एमआयएलच्या सूत्रांनी सांगितले. पण सध्या विमानाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम हे नेहमीच युद्धस्तरावर होते. पण एएआयने निविदा प्रक्रिया आणि कंत्राटदार नियुक्त करण्यात उशीर केला. निविदा प्रक्रिया पूर्ण न करताच विमानाच्या वेळापत्रकात बदल करण्याची सूचना डीजीसीएने केली होती. काम केव्हापासून सुरू करणार, याची ठोस सूचना एएआयचे अधिकारी देतील, तेव्हाच विमानाच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार असल्याचे एमआयएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मान्सूनमध्ये दुरुस्तीचे काम शक्य नाहीजून महिन्यात मान्सूनचे आगमन होईल. त्यामुळे धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम आणखी तीन महिने लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. धावपट्टीची देखभाल-दुरूस्तीची निविदा प्रक्रिया झाल्यानंतरही कंंत्राटदारांना काम सुरू करण्यासाठी तीन महिने वाट पाहावी लागेल. तोपर्यंत प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. आधी वेळापत्रकात बदल झाल्याचा सर्वाधिक फटका प्रवाशांना बसला होता. विमाने रात्री येत असल्याने प्रवाशांना घरी पोहोचण्यासाठी टॅक्सीचे जास्त भाडे द्यावे लागत होते. सध्या ही वेळ टळली आहे.उन्हाळ्याचा हंगाम पाहता विमान कंपन्या नवीन उड्डाणे सुरू करतात. उड्डाणाची वेळ सकाळी १० ते १२ अशी असते. पण आता वेळापत्रकात बदल झाल्याने नवीन उड्डाणे सुरू होऊ शकतात. स्टार एअर २८ मेपासून नागपूर-बेंगळुरू विमानेसवा दुपारी २.५५ वाजता सुरू करीत आहे. त्यामध्ये पुणे येथे जाणाºया विमानाचे शेड्युल सकाळी १० वाजता आहे. तर हेच विमान दुपारी १.२० वाजता नागपुरात परत येणार आहे. आता नवीन वेळापत्रकामुळे विमान कंपन्यांसह प्रवाशांना फायदा होईल.

वेळापत्रकात बदलविमानाच्या वेळापत्रकात नव्याने बदल करण्यात आला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम केव्हापासून सुरू होणार हे प्राधिकरणाने अद्याप कळविले नाही. प्राधिकरणाने कळविल्यानंतरच वेळापत्रकात बदल करण्यात येईल.आबिद रूही, वरिष्ठ विमानतळ संचालक, मिहान इंडिया लिमिटेड.

टॅग्स :nagpurनागपूरAirportविमानतळ