शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पाच हजारांवर गप्पी मासे पाण्यात सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 01:00 IST

राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे औचित्य साधून नागपूर महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे दहाही झोनमध्ये गप्पी मासे वितरण प्रभातफेरी काढण्यात आली. या दरम्यान शहरभरात निरनिराळ्या ठिकाणच्या पाण्यामध्ये सुमारे पाच हजारांवर गप्पी मासे सोडण्यात आले.

ठळक मुद्देडेंग्यू दिवस : हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे दहाही झोनमध्ये प्रभातफेरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय डेंग्यू दिनाचे औचित्य साधून नागपूर महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागातर्फे दहाही झोनमध्ये गप्पी मासे वितरण प्रभातफेरी काढण्यात आली. या दरम्यान शहरभरात निरनिराळ्या ठिकाणच्या पाण्यामध्ये सुमारे पाच हजारांवर गप्पी मासे सोडण्यात आले.मंगळवारी झोनमध्ये जरीपटका येथील दयानंद पार्क येथे प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळती स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी नागरिकांना डेंग्यू आजाराची माहिती दिली. डासांच्या अळ्या होणार नाही यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले. कुकरेजा नगर, कस्तुरबानगर, कुशीनगर, एमआयजी कॉलनी आदी भागातून प्रभातफेरी काढण्यात आली.नेहरुनगर झोनमध्ये विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांच्या उपस्थितीत नेहरूनगर झोनमध्ये नवीन नंदनवन पाण्याच्या टाकीजवळून, प्रभातफेरी काढण्यात आली. तसेच अन्य झोनमध्येही प्रभातफेरी काढण्यात आली. यात धंतोली झोन सभापती विशाखा बांते, नेहरूनगर झोन सभापती रिता मुळे, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, नगरसेविका रेखा साकोरे, वनिता दांडेकर, रूपा राय, शीतल कामडे, जयश्री वाडीभस्मे, दिव्या धुरडे, झिशान मुमताज अन्सारी, आशा ऊईके, सय्यदा बेगम, कांता रारोकर, भावना संतोष लोणारे, मंगला योगेश लांजेवार, नगरसेवक सुनील हिरणवार, सतीश होले, संजय चावरे, हिवताप व हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, राजू वराटे, विजय काळे सहभागी झाले होते.प्रभातफेरीच्या प्रारंभी उपस्थित नागरिकांनी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कीटकजन्य आजारावर नियंत्रण मिळविण्याबाबतची शपथ घेली. नागरिकांना आरोग्य शिक्षण व कीटकजन्य आजाराबाबत माहिती देण्यात आली. प्रभातफेरीदरम्यान पत्रके वाटून, स्टीकर, पोस्टर लावून जनजागृती करण्यात आली. त्यानंतर प्रत्येक झोनमध्ये गप्पी मासे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.३१०० घरांना भेटीप्रभातफेरीदरम्यान सर्व झोनमधून एकूण ३१०० घरांना भेटी देण्यात आल्या. या भेटीत कुलरमध्ये ३८३०, निरुपयोगी विहिरींमध्ये २७, टाक्यांमध्ये ८१९, मातीच्या भांड्यात १५५, कारंज्यांमध्ये सात, मोठ्या नाल्यांमध्ये सात, लहान नाल्यांमध्ये नऊ, तळघरांमध्ये पाच, रिकाम्या भूखंडांवर तीन, बांधकामाच्या स्थळी असलेल्या लिफ्टच्या खड्डयांमध्ये तीन, वेगवेगळ्या प्रकारच्या खड्डयांमध्ये १२ आणि अन्य ठिकाणी २०७ असे एकंदर पाच हजारांवर गप्पी मासे सोडण्यात आले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाdengueडेंग्यू