शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बंद एस्केलेटरमुळे रेल्वे प्रवाशांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील भागात असलेले एस्केलेटर (स्वयंचलित जीना) गुरुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत बंद असल्यामुळे या भागातून रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला.गुरुवारी सकाळपासून पूर्वेकडील संत्रा मार्केट भागातील एस्केलेटर बंद होते. बंद एस्केलेटर सुरू करण्यासाठी रेल्वेचा एकही कर्मचारी तेथे उपस्थित नसल्याचे चित्र पाहावयास मिळाले. मध्यंतरी ...

ठळक मुद्देसंत्र मार्केटकडील घटना : ज्येष्ठ प्रवाशांची झाली गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील भागात असलेले एस्केलेटर (स्वयंचलित जीना) गुरुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत बंद असल्यामुळे या भागातून रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना मनस्तापाचा सामना करावा लागला.गुरुवारी सकाळपासून पूर्वेकडील संत्रा मार्केट भागातील एस्केलेटर बंद होते. बंद एस्केलेटर सुरू करण्यासाठी रेल्वेचा एकही कर्मचारी तेथे उपस्थित नसल्याचे चित्र पाहावयास मिळाले. मध्यंतरी दोन वेळा हे एस्केलेटर सुरू होऊन पुन्हा बंद झाले. यामुळे संत्रा मार्केट भागातून रेल्वेस्थानकाच्या आत प्रवेश करणाऱ्या  प्रवाशांना त्रास झाला. यात सामान घेऊन रेल्वेस्थानकात जाणाऱ्या  ज्येष्ठ प्रवाशांना आणखीनच मनस्ताप होऊन त्यांना पायऱ्या  चढून ओव्हरब्रीजवर जाण्याची पाळी आली. या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने एकही कर्मचारी बंद पडलेले एस्केलेटरची दुरुस्ती करण्यासाठी तैनात न केल्यामुळे दुपारी ३ वाजेपर्यंत प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. रेल्वे प्रशासनातर्फे प्लॅटफार्मवरही एस्केलेटर लावण्याची तयारी सुरूआहे. परंतु एस्केलेटर लावून मोकळे व्हायचे आणि ते बंद पडल्यानंतर सुरू करण्यासाठी एकही कर्मचारी तैनात करायचा नाही या भूमिकेमुळे प्रवाशांना मनस्तापच होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने एस्केलेटर बंद पडू नये आणि बंद पडलेले एस्केलेटर त्वरित सुरू करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरRailway Passengerरेल्वे प्रवासी