शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील अभियंत्याला सव्वाआठ लाखांचा गंडा; भूखंडाची रक्कम हडपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 14:26 IST

भूखंड विक्रीचा करारनामा करून नागपुरातील एका अभियंत्याकडून सव्वा आठ लाख रुपये हडपणाऱ्या दोन दलालांवर पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देदोघांवर कोराडीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भूखंड विक्रीचा करारनामा करून नागपुरातील एका अभियंत्याकडून सव्वा आठ लाख रुपये हडपणाऱ्या दोन दलालांवर पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. तेलंगखेडी मार्गावर राहणारे रूचीत धनराज लाडे हे सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता आहेत. त्यांनी कोराडी पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीनुसार, स्वत:चे घर बांधण्यासाठी लाडे अनेक दिवसांपासून कोराडी परिसरात भूखंड शोधत होते. पुरुषोत्तम मारोती साखरे (वय ६३, रा. हुडको कॉलनी, नारा) आणि अ‍ॅन्थोनी शंकर टेंभेकर (वय ३५, रा. सुगतनगर) या दोघांसोबत त्यांची दीड वर्षांपूर्वी भेट झाली. काळे लॅण्ड डेव्हलपर्सच्या कोराडीतील खसरा क्रमांक १३९ मधील लेआउटमध्ये आपला भूखंड आहे, असे आरोपींनी लाडे यांना सांगितले. त्यावरून त्यांनी आरोपी साखरे आणि टेंभेकर सोबत ३२ क्रमांकाचा भूखंड विकत घेण्याचा सौदा केला. त्यांना ८ लाख, १५ हजार रुपये दिले. १ जुलै २०१६ ते ७ मे २०१७ या कालावधीत आरोपींनी लाडे यांच्याकडून ही रक्कम घेतली. आता दीड वर्षाचा कालावधी झाला तरी त्यांनी या भूखंडाची विक्री लाडे यांना करून दिली नाही. संशय बळावल्यामुळे लाडे यांनी चौकशी केली असता तो भूखंड आरोपींचा नसल्याचे त्यांना कळले. त्यामुळे त्यांनी आरोपींना आपली रक्कम परत मागितली. मात्र, आरोपींनी रक्कमही परत केली नाही. त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे लाडे यांनी कोराडी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक पुंडलीक बोंडे आरोपींचा शोध घेत आहेत.

 

टॅग्स :Crimeगुन्हा