शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात कुत्र्याने डोके फोडलेल्या चिमुकलीचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 00:47 IST

शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. परंतु त्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे वास्तव आहे. तर, दुसरीकडे अशा मोकाट कुत्र्यांकडून चावा घेतलेल्यांंना मोफत उपचार देण्याचे सौजन्यही प्रशासन दाखवीत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. शुक्रवारी पिसाळलेल्या कुत्र्याने चार वर्षीय चिमुकलीचे अक्षरश: डोके फोडले. तिला मेयोत दाखल केले. परंतु रुग्णालयात औषधे नसल्याने हातमजुरी करणाऱ्या तिच्या वडिलांनी ‘अ‍ॅण्टीरेबिज’ लसीसोबत इतर औषधे आणून दिल्यावरच उपचाराला सुरुवात झाली. या प्रकरणाला घेऊन मेयो प्रशासनालाच रेबीज झाल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देप्रशासनालाच झाला रेबीज : बीपीएल असूनही विकत घ्यावी लागली लस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. परंतु त्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे वास्तव आहे. तर, दुसरीकडे अशा मोकाट कुत्र्यांकडून चावा घेतलेल्यांंना मोफत उपचार देण्याचे सौजन्यही प्रशासन दाखवीत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. शुक्रवारी पिसाळलेल्या कुत्र्याने चार वर्षीय चिमुकलीचे अक्षरश: डोके फोडले. तिला मेयोत दाखल केले. परंतु रुग्णालयात औषधे नसल्याने हातमजुरी करणाऱ्या तिच्या वडिलांनी ‘अ‍ॅण्टीरेबिज’ लसीसोबत इतर औषधे आणून दिल्यावरच उपचाराला सुरुवात झाली. या प्रकरणाला घेऊन मेयो प्रशासनालाच रेबीज झाल्याचे बोलले जात आहे.शहरातील रस्त्यावर कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी दिसून येतात. रात्रपाळी करून घरी परतणाºया नागरिकांच्या अंगावर हीच मोकाट कुत्री धावून जातात. एकटी लहान मुले दिसली की तुटून पडतात. शुक्रवार सायंकाळी अशीच घटना घडली. तांडापेठ येथे चार वर्षीय चिमुकली त्रिशा काठीकर आपल्या घरासमोर खेळत होती. अचानक एका पिसाळलेल्या कुत्राने तिच्यावर उडी मारून डाव्या डोळ्याच्या वरील डोके जबड्यात पकडले. तिच्या आरडाओरडीने घरातील लोक बाहेर आले. त्रिशाला त्यास्थितीत पाहत अनेक जण घाबरले. हातात मिळेल त्या वस्तूने कुत्र्याला मारणे सुरू केले. परंतु कुत्रा त्रिशाला सोडायला तयार नव्हता. लोकांनी जेव्हा काठ्या मारायला सुरुवात केली तेव्हा कुठे कुत्र्याने त्रिशाला सोडले. कुत्र्याच्या चावाने त्रिशाचे डोके पूर्ण फाटले. रक्तस्रावही मोठ्या प्रमाणात होत होता. त्याच अवस्थेत तिला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) दाखल केले. रुग्णालयाच्या शल्यचिकित्सा विभागातील डॉक्टरांनी तातडीने तिच्यावर उपचार सुरू केले. परंतु रुग्णालयात औषधेच नसल्याने नाईलाजाने त्यांना बाहेरून औषधे आणण्यास सांगितले. त्रिशाचे वडील हातमजुरी करतात. त्यांच्याकडे ‘बीपीएल’चे कार्डही आहे. परंतु रात्रीची वेळ असल्याने कार्डाचा उपयोग झाला नाही. त्यांनी इतरांकडून उसणे पैसे घेत अ‍ॅन्टीरेबिज लसीसह इतरही औषधे विकत घेऊन डॉक्टरांना दिली. दुसºया दिवशी शनिवारीही त्यांना बाहेरून औषधे लिहून दिली. त्रिशाच्या नातेवाईकाने ‘लोकमत’ला फोन करून याविषयी माहिती दिली. ‘लोकमत प्रतिनिधी’ने संबंधित विभागाच्या प्रमुखांशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने रुग्णालयातून औषधे उपलब्ध करून देण्याचा सूचना संबंधित डॉक्टरांना दिल्या. तूर्तास त्रिशाची प्रकृती गंभीर आहे. जखम खोलवर असून तिथे टाकेही लावणे कठीण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.बजेरिया चौक, मासोळी मार्केट आणि संत्रा मार्केटच्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. कुत्र्यांच्या दहशतीमुळे सामान्य नागरिकांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. मोटरसायकल आणि वाहनांच्या मागे कुत्री धावतात. यामुळे अपघातांच्या घटनाही वाढल्या आहेत. विशेष म्हणजे, या भागातील लोक रात्री घराबाहेर पडण्यास भितात. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, कुत्र्यांच्या दहशतीची तक्रार वारंवार करूनही अद्यापही उपाययोजना करण्यात आली नाही.

टॅग्स :dogकुत्राnagpurनागपूर