शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

शांतता यात्रेत नागपूरच्याही डॉक्टरांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 00:51 IST

इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) १२ मार्चला साबरमती येथील आश्रमातून शांतता यात्रा काढण्यात येणार आहे. यात देशभरातून २५ हजार डॉक्टर सहभागी होणार असून, नागपुरातील डॉक्टरांचाही समावेश असणार आहे.

ठळक मुद्देआयएमए : डॉक्टरांवरील हल्ल्याच्या विरोधात कठोर कायद्याची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : डॉक्टरांवर सातत्याने हल्ले सुरू आहेत. याविरोधात केंद्रीय पातळीवर कठोर असा कायदा करावा, ‘नॅशनल मेडिकल कमिशन’मधील काही तरतुदी वगळण्यात याव्यात तर काहींमध्ये सुधारणा करण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे (आयएमए) १२ मार्चला साबरमती येथील आश्रमातून शांतता यात्रा काढण्यात येणार आहे. यात देशभरातून २५ हजार डॉक्टर सहभागी होणार असून, नागपुरातील डॉक्टरांचाही समावेश असणार आहे.नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) हे डॉक्टर्स, शिकाऊ डॉक्टर, सामान्य लोक, गरीब रुग्ण, लोकशाही व संघराज्य विरोधी असून अप्रातिनिधिक आहे, या विधेयकामुळे शिकाऊ डॉक्टरांच्या हिताला बाधा पोहचत आहे. त्यामुळे देशभरातील शिकाऊ व निवासी डॉक्टर्स यांनी या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन केले, संपही पुकारला. परंतु केंद्र शासनाने अद्यापही याची दखल घेतली नाही. यामुळे आमदारांपासून ते खासदार आणि नेत्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत ‘आयएमए’ने निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती ‘आयएमए’ महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ. वाय. एस. देशपांडे यांनी दिली.डॉक्टर व रुग्णालयांवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी ‘द हेल्थकेअर सर्व्हिस पर्सन्स अ‍ॅण्ड हेल्थ केअर सर्व्हिस इन्स्टिट्युशन्स’ हे विधेयक संसदेत सादर केले जाणार होते, पण गृहखात्याने अचानक ते विधेयक मागे घेतले. देशातील २२ राज्यांमध्ये हा कायदा आहे; पण केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ‘आयएमए’तर्फे करण्यात आला आहे. या दोन्ही विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी शांतता यात्रेत मोठ्या संख्येत डॉक्टर सहभागी होणार आहेत. यात नागपुरातील २५ वर डॉक्टर सहभागी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ‘आयएमए’ नागपूरचे अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला यांनी दिली.

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर