लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बारावीच्या निकालात यंदा प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा आकडा चक्क दहा हजारांच्या पार गेला आहे. विभागीय मंडळाच्या आकडेवारीनुसार यंदा नागपूर विभागात १० हजार ३०२ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. एकूण परीक्षार्थ्यांचा विचार केला तर सात टक्के विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षी प्रावीण्य श्रेणीत ९ हजार ३१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते व यंदा प्रावीण्य श्रेणीतील विद्यार्थ्यांची संख्या १० टक्क्यांहून अधिक वाढली आहे.नागपूर विभागात एकूण १ लाख ४४ हजार १७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील ४५ हजार ७४८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आले आहेत. यांची टक्केवारी ३१.७३ टक्के इतकी आहे. तर द्वितीय श्रेणीत ८० हजार १३५ म्हणजेच ५५.५८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वाधिक विद्यार्थी याच श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. प्रावीण्य श्रेणीत सर्वाधिक ६ हजार ३४८ विद्यार्थी नागपूर जिल्ह्यातील आहेत.विद्यार्थ्यांची श्रेणीनिहाय आकडेवारीजिल्हा प्रावीण्य श्रेणी पहिली श्रेणी द्वितीय श्रेणीभंडारा ६८३ ५२५१ ९९७१चंद्रपूर १०९९ ७१२१ १५६२०नागपूर ६३४८ १९१५० २८७६१वर्धा ९७७ ४४७७ ८०५९गडचिरोली २२४ २२४७ ७६१६गोंदिया ९७१ ७५०२ १०१०८एकूण १०३०२ ४५७४८ ८०१३५
Maharashtra HSC result 2018: नागपूर विभागात दहा हजारांहून अधिक विद्यार्थी ‘प्रावीण्य’ श्रेणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 22:42 IST
बारावीच्या निकालात यंदा प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा आकडा चक्क दहा हजारांच्या पार गेला आहे. विभागीय मंडळाच्या आकडेवारीनुसार यंदा नागपूर विभागात १० हजार ३०२ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. एकूण परीक्षार्थ्यांचा विचार केला तर सात टक्के विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षी प्रावीण्य श्रेणीत ९ हजार ३१४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते व यंदा प्रावीण्य श्रेणीतील विद्यार्थ्यांची संख्या १० टक्क्यांहून अधिक वाढली आहे.
Maharashtra HSC result 2018: नागपूर विभागात दहा हजारांहून अधिक विद्यार्थी ‘प्रावीण्य’ श्रेणीत
ठळक मुद्देद्वितीय श्रेणीत सर्वाधिक उत्तीर्णमागील वर्षीच्या तुलनेत प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांत १० टक्क्यांहून अधिक वाढ