शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभाग :  २० लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 00:32 IST

२० लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी होणार असून खरीप हंगामासाठी जिल्हानिहाय शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेले बियाणे व खते उपलब्ध असल्याची माहिती कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी शुक्रवारी दिली.

ठळक मुद्दे‘लॉकडाऊन’मध्येही आवश्यकतेनुसार बियाणे व खते उपलब्ध होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या ‘लॉकडाऊन’ची परिस्थिती असली तरी शेतीच्या खरीप हंगामासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. विभागात सरासरी खरीप पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. २० लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी होणार असून खरीप हंगामासाठी जिल्हानिहाय शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेले बियाणे व खते उपलब्ध असल्याची माहिती कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी शुक्रवारी दिली.खरीप हंगामासाठी कापूस सोयाबीन तूर, भात आदी पिकांचे नियोजन कृषी विभागतर्फे जिल्हानिहाय करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक असलेले बियाणे मागणीनुसार कृषीसेवा केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. लॉकडाऊनच्या काळात कृषी विभागातर्फे तालुका तसेच मंडळस्तरावर गावनिहाय खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या बियाणे व खतांच्या पुरवठ्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.खरीप हंगामातील विविध पिकानुसार पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये कापूस पिकासाठी विभागात ६ लाख ७२ हजार ३८७ हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले असून सोयाबीन पिकांतर्गत सरासरी ३ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यासोबतच तूर पिकांतर्गत १ लाख ९४ हजार ५६७ हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले आहे.भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यात भात पिकांची प्रामुख्याने लागवड होत असल्यामुळे या पिकांतर्गत खरीप हंगामात ७ लाख ८९ हजार १७४ हेक्टर क्षेत्रावर नियोजन करण्यात आले आहे. कृषी विभागातर्फे खरीप हंगामातील पिकांच्या बियाण्यांचे जिल्हानिहाय नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :agricultureशेतीnagpurनागपूर