शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

 आधार नोंदणीमध्ये नागपूर जिल्हा माघारला! राज्यात २२ व्या क्रमांकावर

By गणेश हुड | Updated: May 10, 2023 18:20 IST

Nagpur News राज्य शालेय शिक्षण विभागाने स्टुडंट्स पोर्टलवर  विद्यार्थ्यांचे आधार नोंदणीकरण आणि प्रमाणिकरण करण्याला मुदतवाढ दिली. आधिच आधार अपडेटमध्ये नागपूर जिल्हा माघरला असून राज्यात २२ व्या क्रमांकावर आहे.

गणेश हूड नागपूर :  राज्य शालेय शिक्षण विभागाने स्टुडंट्स पोर्टलवर  विद्यार्थ्यांचे आधार नोंदणीकरण आणि प्रमाणिकरण करण्याला मुदतवाढ दिली. आधिच आधार अपडेटमध्ये नागपूर जिल्हा माघरला असून राज्यात २२ व्या क्रमांकावर आहे. मुदतवाढीमुळे थोडा दिलासा मिळाला असला तरी  संकेतस्थळातील तांत्रिक अडचणी, सर्व्हर डाऊनची समस्या यामुळे शिक्षण विभाग त्रस्त आहे. 

संच मान्यतेसाठी ३० एप्रिल पर्यंत  आधार नोदणी व प्रमाणिकरण  बंधनकारक केले होते.  परंतु  ७७ टक्के आधार अपडेट झाले आहेत.  तांत्रिक अडचणीमुळे अजूनही या कामाला अपेक्षित गती मिळालेली नाही.  त्यात हजारो विद्यार्थ्यांच्या आधार कार्डातील तपशील जुळत नाही, असे अडथळे येत आहेत. जिल्ह्यातील काम हळूहळू सुधारत असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.  जिल्ह्यातील सुमारे ८ लाख ३४ हजार ३३२ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ९० हजार ८०४ विद्यार्थी अद्यापही आधार अपडेट नाही. यामुळे  पटसंख्या कमी दिसत असल्याने  शिक्षकांची पदे संचमान्यतेत कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

        विद्यार्थिसंख्येनुसार शिक्षण विभागांकडून शिक्षक पदांना मान्यता (संच मान्यता) देण्यात येते. बनावट बोगस विद्यार्थी दाखवून शिक्षक पदे भरण्यात आल्याचे काही वर्षांपूर्वी उघडकीस आले. त्यामुळे राज्यातील सर्व माध्यमाच्या शासन मान्यताप्राप्त शाळांमधील विद्यार्थ्यांची ऑनलाइन आधार नोंदणी करण्याची मोहीम शालेय शिक्षण विभागाने हाती घेतली आहे. त्याअंतर्गत इयत्ता पहिली ते बारावी अखेरच्या विद्यार्थ्यांची आधारनुसार माहिती स्टुडंट्स पोर्टलवर नोंदविण्याचा आदेश दिला आहे. त्यासाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदत होती.  याला  मुदतवाढ देण्यात आली आहे. सर्व्हर डाऊन असल्याने अडथळा शाळा-प्रशासन स्तरावर विद्यार्थ्यांचे आधार अपलोडिंग आणि राज्यस्तरावर तपासणीचे काम सुरुच आहे. अनेक विद्यार्थ्यांनी आधार कार्ड अजूनही काढलेली नाहीत. अनेकांनी ती अद्ययावत केलेली नाहीत. शाळेतील नोंदणीशी विद्यार्थ्यांच्या आधारवरील माहिती जुळत नाही. त्यात सर्व्हर डाऊन होण्याच्या तक्रारी असल्याने  ऑनलाईन  कामांना गती  नसल्याची मुख्याध्यापकांची तक्रार आहे.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड