शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्हा ‘जलयुक्त’कडून दुष्काळ’मुक्तीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 11:13 IST

जिल्ह्यातील १३ पैकी नरखेड व काटोल तालुके ‘डार्क झोन’मध्ये आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे या दोन्हीसह इतर ११ तालुक्यांमधील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे.

ठळक मुद्दे८८८ गावांमध्ये जलसंधारणाची कामे ‘डार्क झोन’मधील तीन तालुक्यांवर अधिक भर

सुनील चरपे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील १३ पैकी नरखेड व काटोल तालुके ‘डार्क झोन’मध्ये आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे या दोन्हीसह इतर ११ तालुक्यांमधील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे. संरक्षित सिंचनाचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील भूगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. त्यामुळे सावनेरसह रामटेक, कुही, पारशिवनी व अन्य तालुक्यात जलसंधारणाची कामे करून तेथील पाणीसमस्या कायम दूर करणे गरजेचे आहे. शिवाय, या कामाच्या दर्जाबाबत रामटेक व उमरेड तालुक्यात तक्रारी प्राप्त झाल्याने त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे.

काटोल तालुका अव्वल‘ऑरेंज बेल्ट’ म्हणून ओळख असलेला तसेच ‘डार्क झोन’मध्ये गेलेला काटोल तालुका जलयुक्त शिवार अभियानात अव्वल राहिला आहे. सन २०१५-१६ ते २०१८-१९ या काळात काटोल तालुक्यातील १३४ गावांमध्ये या अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे करण्यात आली. या तालुक्याच्या भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. दुष्काळमुक्तीकडे वाटचाल करीत असलेला हा तालुका अभियानामध्ये जिल्ह्यात अव्वल ठरला आहे.

जलयुक्त शिवार कामेजलयुक्त शिवार अभियानांतर्गत भूजल पुनर्भरण व संरक्षित सिंचन क्षमता वाढविण्यासाठी नाला, विविध तलाव व लघु सिंचन प्रकल्पांमधील गाळ काढणे, नाल्याचे खोलीकरण करून त्यावर मातीबांध, सीसीटी, दगडीबांध, गॅबियन बंधारे, भात खचरे (धानाच्या बांध्या), शेततळ्यांची निर्मिती करणे, सार्वजनिक व खासगी विहिरींचे पुनरुज्जीवन व खोलीकरण करून त्यांचे पुनर्भरण करणे, जनजागृती करणे, जमिनीची धूप टाळण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन आदी कामे करण्यात आली.

जलयुक्त शिवारचा फायदा डार्क झोनमधील काटोल व नरखेड तालुक्याला झाला. नाला खोलीकरण, बंधारे पुनरुज्जीवनामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला. दोन वर्षातही मोठ्या प्रमाणात कामे झाली.- संदीप सरोदे,

या अभियानांतर्गत करण्यात आलेली कामे शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरली आहेत. शेतकऱ्यांची भांडणे टाळण्यासाठी नाल्याच्या खोलीकरणाची लांबी वाढवून कामाच्या दर्जात सुधारणा करणे अत्यंत गरजेचे आहे.- महेंद्र दिवटे,माजी सरपंच, भंडारबोडी, ता. रामटेक.माजी सभापती, पंचायत समिती, काटोल.

टॅग्स :Waterपाणी