शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मायक्रोमॅक्स कंपनीला नागपूर जिल्हा ग्राहक मंचचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 21:13 IST

ग्राहकास दर्जाहीन मोबाईल विकल्यामुळे मायक्रोमॅक्स इन्फ्रामॅटिक्स कंपनी, कंपनीचे धरमपेठ येथील विक्रेते मोबाईल डेन व धंतोली येथील सेवा केंद्र एल. रजा मायक्रोमॅक्स यांना दणका बसला. या तिघांनीही पीडित महिला ग्राहकास समान मॉडेलचा नवीन मोबाईल द्यावा किंवा मोबाईलची किंमत ६४०० रुपये १८ टक्के व्याजासह परत करावी असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दिला. तसेच, ग्राहकास पाच हजार रुपये भरपाईही मंजूर केली.

ठळक मुद्देग्राहकास दर्जाहीन मोबाईल विकला : नवीन मोबाईल किंवा पैसे देण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क    नागपूर : ग्राहकास दर्जाहीन मोबाईल विकल्यामुळे मायक्रोमॅक्स इन्फ्रामॅटिक्स कंपनी, कंपनीचे धरमपेठ येथील विक्रेते मोबाईल डेन व धंतोली येथील सेवा केंद्र एल. रजा मायक्रोमॅक्स यांना दणका बसला. या तिघांनीही पीडित महिला ग्राहकास समान मॉडेलचा नवीन मोबाईल द्यावा किंवा मोबाईलची किंमत ६४०० रुपये १८ टक्के व्याजासह परत करावी असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने दिला. तसेच, ग्राहकास पाच हजार रुपये भरपाईही मंजूर केली.मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य नितीन घरडे व चंद्रिका बैस यांनी हा निर्णय दिला. मोबाईलच्या किमतीवर २४ आॅक्टोबर २०१४ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत व्याज लागू करण्यात आले. ग्राहकास शारीरिक-मानसिक त्रासाकरिता तीन हजार व तक्रारीचा खर्च म्हणून दोन हजार अशी एकूण पाच हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली.सुनीता टोपरे असे तक्रारकर्तीचे नाव असून त्या रामदासपेठ येथील रहिवासी आहेत. २४ आॅक्टोबर २०१४ रोजी त्यांनी मोबाईल डेन यांच्याकडून ६४०० रुपयांत मायक्रोमॅक्स हॅन्डसेट खरेदी केला होता. हॅन्डसेटवर दोन वर्षांची वॉरन्टी असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर दोन महिन्यातच हॅन्डसेटमध्ये बिघाड आला. त्यामुळे त्यांनी १८ आॅगस्ट २०१५ रोजी एल. रजा मायक्रोमॅक्स यांच्याकडे हॅन्डसेट दुरुस्तीकरिता दिला. दुरुस्तीनंतर मोबाईल काही दिवस चांगला चालला. दुसऱ्यांदा बिघाड आल्यानंतर त्यांनी २३ आॅक्टोबर २०१५ रोजी हॅन्डसेट दुरुस्तीसाठी दिला. परंतु, सेवा केंद्राने हॅन्डसेट दुरुस्त करून देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे टोपरे यांनी ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम १२ अंतर्गत मंचमध्ये तक्रार दाखल केली. मंचने विविध बाबी लक्षात घेता त्यांनी तक्रार अंशत: मंजूर करून हा निर्णय दिला.अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंबतक्रारकर्तीने मोबाईल खरेदी केला, पण त्यांना त्याचा उपभोग घेता आला नाही. दोनवेळा मोबाईल दुरुस्त करुनही काही फायदा झाला नाही. त्यामुळे सेवा केंद्राने नवीन मोबाईल देण्याची ग्वाही दिली होती. परंतु, त्यानुसार तक्रारकर्तीला मोबाईल बदलवून देण्यात आला नाही. त्यावरून तिन्ही प्रतिवादींनी अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्याचे व सेवेत त्रुटी ठेवल्याचे सिद्ध होते असे निरीक्षण मंचने हा निर्णय देताना नोेंदवले.

टॅग्स :Nagpur District Consumer Forumनागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचMobileमोबाइल