शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नागपूर  जिल्ह्यात विधानसभेसाठी ४,३८२ मतदान केंद्र : अश्विन मुदगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 20:33 IST

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ४,३८२ मतदान केंद्र असणार आहेत. निवडणुकीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.

ठळक मुद्देउपनिवडणूक आयुक्तांकडून व्हिडीओ कान्फरन्सिंगद्वारे आढावा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या संपूर्ण व्यवस्थेचा आढावा व्हिडीओ कान्फरन्सिग व्दारे निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमार यांनी घेतला. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ४,३८२ मतदान केंद्र असणार आहेत. मतदारांसाठी आयोगाच्या निर्देशानुसार केंद्रावर सर्व सुविधा देण्यात येणार आहेत.यामध्ये वैद्यकीय कीट, विद्युत पुरवठा, मतदारासाठी मदत केंद्र, मतदान केंद्राबाबत माहिती फलक, आदी सुविधा राहणार आहेत.विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात मतदानासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. निवडणुकीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली. यावेळी पोलीस आयुक्त डॉ.भूषणकुमार उपाध्याय,जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.मतदानाची संपूर्ण प्रक्रिया सुलभपणे पार पाडण्यासाठी २१ हजार ९७० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत असून ४ हजार ९८२ कर्मचारी राखीव ठेवण्यात येणार आहेत. पारदर्शक निवडणुकांसाठी व्हिडीओ सर्व्हिलन्स टीम,फ्लाईग स्क्वॉड आदीचे गठन करण्यात येणार आहे.मतदार जागृती मोहीम मतदारामध्ये जागृती निर्माण करण्यासोबत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट बाबत माहिती देण्यासाठी ५६० मतदारजागृती क्लबची स्थापना करण्यासत आली आहे. या क्लबच्या माध्यतमातुन प्रत्येक गावांमध्ये जागृती मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगीतले. शहर तसेच जिल्ह्यात निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस विभागातर्फे आयोगाच्या निर्देशानानुसार आवश्यक सर्व उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.मागील लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यात आली आहे. निवडणूक विषयक नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याबाबत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ.भुषणकुमार उपाध्याय यांनी यावेळी सांगितले.निवडणुकीसाठी अरूंधती पानतावणे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसडर नवमतदारांमध्ये मतदानाबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक विजेती बॅडमिंटनपटू अरुंधती पानतावणे या नागपूर जिल्ह्यासाठी ब्रॅड अ‍ॅम्बेसडर असणार आहेत. दिव्यांग मतदारांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढावा यासाठी प्रा. विनोद आसुदानी जिल्ह्यासाठी आयकॉन्स राहणार आहेत.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकcollectorजिल्हाधिकारीnagpurनागपूर