शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात जिल्ह्यात कापूस लागवडीच्या क्षेत्रात १० हजार हेक्टरने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 20:09 IST

कृषी विभागाने जिल्ह्याच्या खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. या नियोजनात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा खरिपाचे क्षेत्र ७५०० हेक्टरने घसरले आहे. मात्र कापसाचे क्षेत्र गेल्यावर्षीच्या तुलनेत १० हजार हेक्टरने वाढले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र भातापेक्षाही कमी झाले आहे.

ठळक मुद्देखरिपाचे नियोजन मात्र ७५०० हेक्टरने घसरले : सोयाबीनच्या क्षेत्रात घट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कृषी विभागाने जिल्ह्याच्या खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. या नियोजनात गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा खरिपाचे क्षेत्र ७५०० हेक्टरने घसरले आहे. मात्र कापसाचे क्षेत्र गेल्यावर्षीच्या तुलनेत १० हजार हेक्टरने वाढले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र भातापेक्षाही कमी झाले आहे.यावर्षी कृषी विभागाने जिल्ह्यात ५ लाख १०० हेक्टरवर खरिपाचे नियोजन केले आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र २ लाख ३५ हजार हेक्टर हे कापसाच्या लागवडीखाली येणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कापसाचे क्षेत्र १० हजार हेक्टरने वाढले आहे. २ लाख ३५ हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात येणार आहे. त्यानुसार ४ हजार ५०० क्विंटलवर बीटी कापसाचे बियाणे लागणार आहे. तर खरीप हंगामाच्या एकूण क्षेत्रानुसार ८५ हजार क्विंटलवर बियाणे लागणार आहे. कापसाच्या खालोखाल भाताचे (धान) लागवडी क्षेत्र राहणार आहे. यंदा भाताचा पेरा ९५ हजार हेक्टरवर होणार आहे. त्या खालोखाल सोयाबीनचे क्षेत्र राहणार आहे. सोयाबीनचा यंदा ८५ हजार हेक्टरवर पेरा राहणार आहे. तुरीची ६५ हजार हेक्टरवर लागवड केली जाणार आहे. संकरित ज्वारीच्या लागवडीचे क्षेत्र ३ हजार हेक्टरने घटले आहे. मक्याचा पेरा ५ हजार हेक्टरवर राहणार आहे. तर तीळ ३०० हेक्टरवर लावले जाणार आहे. उडीद, मूग प्रत्येक १५०० हेक्टरवर लावण्याचे कृषी विभागाने नियोजन केले आहे. उसाचा पेरा ३ हजार हेक्टरवर राहणार आहे. कापूस बियाण्यांची टंचाई नाही. कृषी विभागाने महाबीजकडे २० हजार क्विंटलवर बियाण्यांची मागणी केली आहे. त्यामुळे यंदा बियाण्यांची टंचाई जाणवणार नाही अशी अपेक्षा आहे. सोबतच कृषी सेवा केंद्रातही मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध आहे. याशिवाय सर्वच पिकांचे अधिक उत्पादन देणाऱ्या प्रचलित वाणांचे दर्जेदार बियाणे कृषी सेवा केंद्रात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. रासायनिक खतांची उपलब्धतासुद्धा समाधानकारक असल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.शेतीच्या मशागतीच्या कामाला सुरुवातकापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी गावागावात सोशल मीडिया (व्हॉट्सअ‍ॅप)च्या माध्यमातून कृषी सहायक शेतकºयांना मार्गदर्शन करीत आहेत. सोबतच बियाण्यांचे सॅम्पलिंग काढणेही सुरू आहे. सध्या शेतकरी मशागतीच्या कामाला लागले आहे. 

 

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती