शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात खरिपाच्या ८९ टक्के पेरण्या आटोपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 23:08 IST

यावर्षी पावसाने जुलै महिन्याच्या शेवटी शेवटी पदार्पण केल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. जुलै महिन्याच्या सुरुवातीला एक दोन दिवस झालेल्या पावसाने काही शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस पेरला होता. पण भाताच्या रोवण्यासाठी अपेक्षित पाऊस झाला नसल्यामुळे शेतकरी प्रतीक्षेत होते. जुलैच्या अखेर अखेर सुरू झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या ८९ टक्के आटोपल्या आहे. सोबतच धानाच्या रोवणीलाही गती आली आहे.

ठळक मुद्देधान रोवणीला आली गती : शेतकऱ्यांना पावसाचा दिलासा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : यावर्षी पावसाने जुलै महिन्याच्या शेवटी शेवटी पदार्पण केल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. जुलै महिन्याच्या सुरुवातीला एक दोन दिवस झालेल्या पावसाने काही शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस पेरला होता. पण भाताच्या रोवण्यासाठी अपेक्षित पाऊस झाला नसल्यामुळे शेतकरी प्रतीक्षेत होते. जुलैच्या अखेर अखेर सुरू झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या ८९ टक्के आटोपल्या आहे. सोबतच धानाच्या रोवणीलाही गती आली आहे.खरिपामध्ये जिल्ह्यात सर्वाधिक कापूस, सोयाबीन, तूर व धान (भात) हे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. धान वगळता इतर सर्व पिकांच्या जवळपास पेरण्या मागच्या आठ दिवसांपूर्वीच आटोपल्या होत्या. परंतु पाऊस नसल्याने धानाची रोवणी रखडली होती. जिल्ह्यातील मौदा, कामठी, उमरेड, कुही, रामटेक, भिवापूर या तालुक्यांमध्ये धानाचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात धानाचे नियोजित क्षेत्र ९४२०० हेक्टर आहे. पाऊस नसल्याने धानाची रोवणी थांबली होती. २७ जुलैपासून पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतकºयांनी धान रोवणी सुरू केली. आतापर्यंत जिल्ह्यात धानाची २० हजार हेक्टरवर रोवणी झाली आहे.जिल्ह्यात खरिपाचे ४ लाख ७९ हजार २१० हेक्टरवर नियोजन केले आहे. यात कापसाचे नियोजित क्षेत्र २ लाख १९ हजार हेक्टर असून, कापसाची लागवड २ लाख ३१ हजार ७११ हेक्टरवर करण्यात आली आहे. तर सोयाबीनचे १ लाख हेक्टर व भाताचे ९४ हजार २०० हेक्टर क्षेत्र आहे. आजवर जिल्ह्यात एकूण क्षेत्राच्या ४ लाख २० हजार हेक्टरवर म्हणजेच सुमारे ८९ टक्के पेरणी आटोपल्या आहे. यात तुरीची ६२ हजार हेक्टर, भूईमुंग ११६० हेक्टर, सोयाबीन ८२ हजार ९५६, ऊस १२६३ हेक्टर व इतर तेलजन्य बियांची ८४ हजार २६६ हेक्टरवर तसेच ज्वारीची ३०००, मुगाची ६६५ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे.

टॅग्स :agricultureशेतीnagpurनागपूर