शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

नागपूर विभाग ३१ मार्चपर्यंत हागणदारीमुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:40 IST

केंद्र आणि राज्य शासन ग्रामीण जनतेला शुद्ध पाणी पुरवण्यासाठी प्राधान्य देत आहे

ठळक मुद्देश्यामलाल गोयल : पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र आणि राज्य शासन ग्रामीण जनतेला शुद्ध पाणी पुरवण्यासाठी प्राधान्य देत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करणाºया योजना पूर्ण करून विभागातील गावे ३१ मार्च २०१८ पर्यंत हागणदरीमुक्त करण्यासाठी नियोजन करा, अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी दिल्या.विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त अनुप कुमार उपस्थित होते.नागपूर विभागात स्वच्छ ग्रामीण भारत मिशनअंतर्गत भौतिक व आर्थिक प्रगती व उर्वरित कामाचे नियोजन, छायाचित्र अपलोडिंग सद्यस्थिती, हागणदारीमुक्त ग्रामपंचायत व पडताळणी, स्वच्छता दर्पण पुरस्कार, स्वच्छता स्पर्धा सहभाग, नादुरुस्त शौचालय प्रगती व निधी खर्चाचा आढावा, माहिती, शिक्षण व संवाद अंतर्गत विविध उपक्रम व झालेला खर्च आणि सन २०१६-१७ चे उपयोगिता प्रमाणपत्र व लेखा अहवाल व सन २०१७-१८ चे प्रमाणपत्र आदी विषयांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.यावेळी सर्व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे उपसचिव रुचेश जयवंशी, वासोचे संचालक सतीश शहा, भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेचे अपर संचालक डॉ. आय.आय. शाह, मुख्य अभियंता गजभिये, उपायुक्त जाधव, उपायुक्त कमलकिशोर फुटाणे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता व्ही. बी. जगतारे, अधीक्षक अभियंता व्ही. के. शिंगरु, आदी उपस्थित होते.प्रदूषण रोखण्यासाठी ठोस कृती करामुख्यमंत्री ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना प्रोत्साहनपर निधी मिळणार आहे, त्यासाठी जनतेमध्ये जनजागृती करण्याविषयी श्यामलाल गोयल यांनी निर्देश दिले. गावात कोणत्याच प्रकारचे प्रदूषण होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत ठोस कृती करा. सद्यस्थितीत सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून नवीन कामे हाती घेण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी दिल्या.अनुप कुमार यांनी दिली खात्रीविभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी नागपूर विभाग हा ३१ मार्च २०१८ पूर्वीच हागणदारीमुक्त करण्याबाबत अपर मुख्य सचिवांना ग्वाही दिली. तसेच नागपूर विभागात पाणीपुरवठा व स्वच्छता अभियान प्रभावीपणे गाव पातळीवर राबविण्यासाठी माहिती, शिक्षण आणि संवाद हे उपक्रम राबवून ग्रामपंचायती खºया अर्थाने हागणदरीमुक्त करण्याचे आवाहन उपस्थित सर्व जिल्हास्तरीय अधिकाºयांना केले.