शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

Nagpur: "महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये निर्णय वेग वाढावा", शांताक्का यांची मागणी

By योगेश पांडे | Updated: October 4, 2024 22:26 IST

Nagpur RSS News: उशिरा निकाल लागण्यामुळे अनेक पिडीत मुली-महिलांचे आयुष्य उध्वस्त झाले. देशात महिला अत्याचार संदर्भातील कायद्यांमध्ये बदलांची गरज आहे. तसेच या प्रकरणांमध्ये निर्णय प्रक्रियेचा वेग वाढला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी केले.

- योगेश पांडे  नागपूर -  देशातील महिलांवरील वाढते अत्याचार ही गंभीर समस्या आहे. मात्र पिडीत महिलांना लवकर न्याय मिळण्यात होणारा विलंबदेखील चिंताजनक आहे. उशिरा निकाल लागण्यामुळे अनेक पिडीत मुली-महिलांचे आयुष्य उध्वस्त झाले. देशात महिला अत्याचार संदर्भातील कायद्यांमध्ये बदलांची गरज आहे. तसेच या प्रकरणांमध्ये निर्णय प्रक्रियेचा वेग वाढला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांनी केले. नागपुरात राष्ट्रसेविका समितीच्या विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.रेशीमबाग मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला प्रसिद्ध नृत्यांगना डॉ. सोनल मानसिंह, प्रमुख कार्यवाहिका सीता गायत्री, विदर्भ प्रांत कार्यवाहिका मनीषा आठवले आणि नागपूर विभाग कार्यवाहिका करुणा साठे उपस्थित होत्या. महिला अत्याचाराच्या घटना निंदनीयच आहे. त्या महिलांना न्याय मिळणे गरजेचे आहे. सध्या अस्तित्वात असलेले कायदे कठोर करणे व न्यायव्यवस्थेला वेगवान करणे ही काळाची गरज आहे. देशातील सरकार व न्यायव्यवस्थेने मिळून याबाबतीत विचार करायला हवा. सोबतच समाजातदेखील जागृती आवश्यक आहे. मुला-मुलींमध्ये संयमाची निर्मिती केली पाहिजे. त्यांच्या दृष्टीकोनात परिवर्तन घडवून आणण्याचे प्रयत्न विविध ठिकाणी झाले पाहिजे. महिलांनी आपल्यातील सौम्य आणि रौद्र शक्तीचा योग्य ठिकाणी वापर करावा. तसेच कुटुंब प्रबोधनातून हिंदू जीवनमूल्यांचे काळानुरुप आचरण करण्यावर भर दिला पाहिजे, असे आवाहन शांताक्का यांनी केले.आपल्या देशात अनेक कर्तुत्ववान महिलांनी योगदान दिले आहे. देशाच्या कणाकणात महिलाशक्ती आहे. आपल्याला या शक्तीचा वारंवार आवाहन करावे लागेल आणि त्या शक्तीला जागवावे लागेल. महिलांनी स्वत:वर विश्वास ठेवला पाहिजे. दुराचारी शक्तींच्या नाशासाठी आणि मातृभूमीच्या रक्षणार्थ आपण एकत्रित यायला हवे, असे मत डॉ.सोनल मानसिंह यांनी व्यक्त केले.योवळी समितीच्या सेविकांनी घोष तसेच इतर शारीरिक प्रात्यक्षिके विविध रचनांसह सादर केली. यात प्रामुख्याने योगासने, रिबिन योग, लेझिम, नियुद्ध, दंड, व्यायामयोग यांचा समावेश होता. अदिती कोलारकर यांनी वैयक्तिक गीत गायले. अदिती देशमुख यांनी संचालन केले. नागपूर विभाग सहकार्यवाहिका वृषाली पुणेकर यांनी आभार मानले. यावेळी समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलताई मेढे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी हेदेखील उपस्थित होते.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर