शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात व्यापाऱ्याला पाच कोटींचा फटका : मुंबईतील तिघांची बनवाबनवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 23:13 IST

नोकर म्हणून कंपनीचे कामकाज सांभाळायला ठेवलेल्या आरोपींनीच कंपनी बुडित काढण्याचा कट करून पाच कोटींचे नुकसान केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. याप्रकरणी कंपनी मालकाच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी मुंबईतील तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देलकडगंज पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नोकर म्हणून कंपनीचे कामकाज सांभाळायला ठेवलेल्या आरोपींनीच कंपनी बुडित काढण्याचा कट करून पाच कोटींचे नुकसान केल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. याप्रकरणी कंपनी मालकाच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी मुंबईतील तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.गरोबा मैदान परिसरातील जगजीवनराम नगरातील रहिवासी अशोककुमार श्रीकिशन अग्रवाल (वय ४९) यांचा कळमन्यातील कापसी परिसरातील कंगवे आणि हेअर ब्रश तयार करण्याचा कारखाना आहे. त्यांनी मुंबई घाटकोपरला रामदेवनगर मार्गावर रिना कॉम्प्लेक्समध्ये कार्यालय सुरू केले होते. तेथील कामकाज सांभाळण्यासाठी अग्रवाल यांनी दिना क्रिष्णा दास (वय ३५, रा. वाशी, मुंबई) आणि नीरव हिरालाल सिंघवी (रा. घाटकोपर) यांना नियुक्त केले होते. व्यवसायाच्या भरभराटीसाठी आणि प्रचार-प्रसारासाठी त्यांनी दिना दासच्या माध्यमातून मिलिंद फाय क्रिएटिव्ह सोल्युशन प्रा.लि. मुंबई नामक कंपनीला आपल्या कंपनीची वेबसाईट बनविण्याची जबाबदारी सोपविली. त्यासाठी त्यांनी १० लाख २८ हजार ९७७ रुपये उपरोक्त कंपनीला दिले.दरम्यान, १ डिसेंबर २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ दरम्यान कंपनीच्या मालाला मागणी कमी झाली आणि व्यापाऱ्यांकडून येणे असलेली रक्कम थांबल्यामुळे अग्रवाल यांनी दासला विचारणा केली. यावेळी दास याने बाजारपेठेत मंदी असल्यामुळे असे होत असल्याचे सांगून वेळ मारून नेली. मात्र, हा प्रकार पुढेही सुरूच राहिल्यामुळे अग्रवाल यांनी बाजारपेठेत चौकशी केली असता, त्यांना धक्कादायक माहिती कळली. आरोपी दास आणि सिंघवी या दोघांनी संगनमत करून बीअर ब्युटी अ‍ॅसेसरीज प्रा. लि. नामक कंपनी सुरू केली. या कंपनीचे कामकाज त्यांनी अग्रवाल यांनी घेतलेल्या कार्यालयातून सुरू केल्याचेही त्यांना लक्षात आले. त्यांनी अग्रवाल यांच्या वेबसाईटचा व्यावसायिक वापर आपल्या कंपनीच्या नावाने सुरू केला. विशेष म्हणजे, अग्रवाल यांच्या कंपनीच्या वेबसाईटमध्ये आरोपी दास आणि सिंघवीने मिलिंद नामक आरोपीच्या माध्यमातून असे काही तांत्रिक बदल करून घेतले की अग्रवाल यांच्या कंपनीची वेबसाईट ओपन करताच आरोपींच्या कंपनीची वेबसाईट सुरू होत होती. यासंबंधाने अग्रवाल यांनी आरोपी दासला विचारणा केली असता, त्याने हा व्यवसाय माझा आहे, तुम्ही आता बाकी विसरून जा नाही तर तुमच्याकडून जे होते ते करून घ्या, असे म्हटले.अखेर गुन्हा दाखलनोकर म्हणून कंपनीचे कामकाज सांभाळायला ठेवलेल्या आरोपींनीच कंपनी बुडित काढण्याचा कट करून पाच कोटींचे नुकसान केल्याचे उघड झाल्याने अग्रवाल यांनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदविली. लकडगंज पोलिसांनी या प्रकरणाची प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर आरोपी दास, सिंघवी आणि वेबसाईट तयार करून देणाऱ्या आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीbusinessव्यवसाय