शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

नागपुरात सायबरटेकची किमया ! घरटॅक्स ८०० झाले १८०००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 23:51 IST

शहरातील मालमत्तांचा सर्वे करताना मे.सायबरटेक सिस्टम्स अ‍ॅन्ड सॉफ्टवेअर लिमिटेड कंपनीची मनमानी सुरू आहे. वर्षाला ८०० रुपये टॅक्स येणाऱ्याला १८००० डिमांड पाठविले आहे.

ठळक मुद्देमनपाच्या घरांच्या सर्वेवर प्रश्नचिन्ह: नागरिक संतप्त

आॅनलाईन लोकमतनागपूर : शहरातील मालमत्तांचा सर्वे करताना मे.सायबरटेक सिस्टम्स अ‍ॅन्ड सॉफ्टवेअर लिमिटेड कंपनीची मनमानी सुरू आहे. वर्षाला ८०० रुपये टॅक्स येणाऱ्याला १८००० डिमांड पाठविले आहे. दरवर्षी १७६६ रुपये टॅक्स भरणाऱ्याला ३२,७१७ रुपयांचा तर ८८६ रुपयांचा टॅक्स तब्बल १४,८८७ रुपये लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे नोटिफाईड स्लम भागातील घरांवर आकारण्यात आलेल्या टॅक्सची ही आकडेवारी आहे. वाढीव टॅक्सच्या डिमांड वाटपाचे काम सुरू आहे. परंतु आवाक्याबाहेरील घरटॅक्सच्या डिमांड लोकांना मिळताच याचा भडका उडण्याची शक्यता आहे.प्रभाग क्रमांक २१ मधील नोटिफाईड स्लम असलेल्या लालगंज गुजरी येथील रहिवाशांना सुधारित घरटॅक्स डिमांड पाठविण्यात आलेल्या आहेत. गजानन पौनीकर यांचा घर क्रमांक ३९० आहे. त्यांना वर्षाला ८१७ रुपये टॅक्स येत होता. कोणत्याही प्रकारची थकबाकी नसताना त्यांना १८,१९७ रुपयांचे डिमांड पाठविण्यात आले आहे. याच वस्तीतील अनिल माकोडे यांच्या घर क्रमांक ५८० वर दरवर्षी १७६६ रुपये टॅक्स आकारला जात होता. त्यांना ३२,७१७ रुपयांचे डिमांड पाठविण्यात आले आहे. तर रामभाऊ तख्तेवाले यांच्या ३८७ क्रमांकाच्या घरावर ८८६ रुपये टॅक्स आकारला जात होता. त्यांना १४,८८७ रुपयांचे तर ९०० रुपये टॅक्स भरणाºया मोहन हिरालाल शेंडे याना ७७९९ रुपयांचे डिमांड पाठविले आहे. अन्य लोकांनाही अशाच वाढीव रकमेच्या डिमांड पाठविण्यात आल्या आहे.या वस्तीतील बहुसंख्य नागरिक मोलमजुरी वा लहानसहान व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. अशा परिस्थितीत १० ते २० पट वाढीव टॅक्स कसा भरणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील ज्या-ज्या भागात टॅक्सच्या नवीन डिमांडचे वाटप सुरू आहे. अशा भागातील नागरिकांचीही अशीच ओरड आहे.प्रभागाच्या नगरसेविका आभा पांडे यांनी जुन्या व नवीन टॅक्स आकारणीची आकडेवारीसह माहिती दिली. डिमांड वाटपाची प्रक्रिया सुरू असल्याने अद्याप मोजक्याच नागरिकांना डिमांड मिळाल्या आहेत. आवाक्याबाहेरील डिमांडमुळे नागरिकांत असंतोष वाढत आहे. सर्वांना डिमांड मिळताच असंतोषाचा भडका उडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Taxकरnagpurनागपूर