शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सायबर गुन्हेगारांनी प्राध्यापकाला लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 20:03 IST

डेबिट कार्ड सुरू करण्याचे आमिष देऊन सायबर गुन्हेगारांनी एका प्राध्यापकाच्या खात्यातून एक लाख रुपये उडविल्याची घटना घडली आहे. वंजारी नगर येथील रहिवासी डॉ. विजय कापसे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.

ठळक मुद्देअजनीत एक गुन्हा दाखल : एक लाख रुपये उडविले

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : डेबिट कार्ड सुरू करण्याचे आमिष देऊन सायबर गुन्हेगारांनी एका प्राध्यापकाच्या खात्यातून एक लाख रुपये उडविल्याची घटना घडली आहे. वंजारी नगर येथील रहिवासी डॉ. विजय कापसे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.डॉ. कापसे यांना २५ मार्चला मोबाईल क्रमांक ८९२७४११६२२ वरून कॉल आला. त्याने मी स्टेट बँक ऑफ इंडिया मेडिकल शाखेतील व्यवस्थापक बोलत असल्याचे सांगितले. आपले नाव त्याने संतोष श्रीवास्तव सांगितले. कोरोनामुळे आम्ही ग्राहकांशी मोबाईलवरून चर्चा करत असल्याची माहिती त्यांनी दिली. आम्ही सर्व ग्राहकांना डेबिट एटीएम कार्ड देत आहोत तुम्हालाही डेबिट किंवा एटीएम कार्ड मिळेल त्यासाठी तुम्हाला जुनी माहिती सांगावी लागेल. असे सांगून त्याने कापसे यांना मोबाईलवर एक लिंक पाठवली. ती लिंक दुसऱ्या मोबाईलवर पाठवण्यास सांगितली. लिंक पाठवल्यानंतर कापसे यांच्या मोबाईलवर ओटीपी आला. त्यांनी कापसे यांना सांगायला लावला. सायबर गुन्हेगारांनी कापसे यांना एक-दोन दिवसात नवीन डेबिट किंवा एटीएम कार्ड घरच्या पत्त्यावर येईल असे सांगितले. सायबर गुन्हेगारांनी मोबाईल बंद करताच कापसे यांना शंका आली. त्यांनी आपल्या खात्यात जमा असलेली रक्कम कुटुंबीयांच्या खात्यात पाठविली. त्यानंतर त्यांना आपल्या खात्यातून एक लाख रुपये काढून घेतल्याची माहिती मिळाली. त्वरित संपर्क साधल्यामुळे सायबर गुन्हेगार हे कापसे यांच्या खात्यातून मोठी रक्कम काढू शकले नाहीत. याबाबत कापसे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तपासानंतर अजनी पोलिसांनी अफरातफरीचा गुन्हा दाखल केला.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजी