शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर सायबर सेलने घातली दिल्लीतील कॉल सेंटरवर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 11:31 IST

प्रतापनगर ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या फसवणूक प्रकरणाच्या तपासात गुन्हे शाखेच्या सायबर सेल आणि प्रतापनगर पोलिसांनी दिल्लीतील एका कॉल सेंटरवर धाड टाकली. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, इतरांचा शोध सुरू आहे.

ठळक मुद्देप्रतापनगर पोलीस ठाण्याची कारवाईएक आरोपी अटकेत, इतरांचा शोध सुरू

आॅनलाईन लोकमतनागपूर : प्रतापनगर ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या फसवणूक प्रकरणाच्या तपासात गुन्हे शाखेच्या सायबर सेल आणि प्रतापनगर पोलिसांनी दिल्लीतील एका कॉल सेंटरवर धाड टाकली. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, इतरांचा शोध सुरू आहे. अटकेतील आरोपी फरिदाबाद येथील सूर्यप्रकाश ईश्वरनाथ तिवारी (२६) आहे. सूर्यप्रकाश कॉल सेंटरचा व्यवस्थापक आहे, तर कॉल सेंटर मालक पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.वर्धा मार्गावर राहणारे उल्हास आत्माराम नंदनकर (५३) यांच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी प्रकरण नोंदविले होते. नंदनकर शासकीय कार्यालयात अधिकारी आहेत. जवळपास एक महिन्यापूर्वी त्यांना एक फोन आला. फोन करणाऱ्याने तो ‘एक्सक्लुसिव्हआॅफर.कॉम’मधून बोलत असल्याचे त्यांना सांगितले. त्याने कंपनीतून आॅनलाईन शॉपिंग करून जोडे खरेदी केल्यास आय-१० कार लागण्याची बतावणी केली. नंदनकर यांना आॅफर आवडली आणि त्यांनी जोडे खरेदी केले. हे जोडे त्यांना मिळाले, मात्र येथून फसवणुकीचा खेळ सुरू झाला. विविध प्रकारचे उपकरण स्वस्त किमतीत देणे आणि जितकी अधिक शॉपिंग कराल बक्षीसमध्ये कार मिळण्याची संधी वाढेल, असे सांगून आरोपींनी त्यांना जाळ्यात अडकवले. त्यांना लकी-ड्रॉमध्ये आय-१० कार लागल्याचे सांगितले. यासाठी त्यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने जवळपास सात लाख रुपये स्वत:च्या खात्यांमध्ये जमा करून घेतले.त्यानंतर अनेकदा त्यांनी कंपनीच्या फोन क्रमांकावर संपर्क साधला, मात्र त्यांना उत्तर मिळाले नाही. नंदनकर यांनी प्रकरणाची तक्रार पोलिसात केली. प्रतापनगर पोलिसांनी सायबर कम्प्लेंट सेलच्या मदतीने प्रकरणाची चौकशी सुरू केली. फोन क्रमांकाच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला. संयुक्त पथक दिल्लीला रवाना झाले. तेथे चौकशी केली असता, साऊथ ईस्ट दिल्लीच्या नेहरू प्लेसमध्ये कॉल सेंटर असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी दिल्लीतील कॉल सेंटरवर धाड टाकली असता सूर्यप्रकाश त्यांच्या हाती लागला.आश्चर्य म्हणजे आॅनलाईन शॉपिंगची ही वेबसाईट आताही सुरू आहे. ही कारवाई डीसीपी श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर, पीएसआय डोर्लीकर, पोहवा संतोष ठाकूर, संतोष मदनकर, अमित भुरे, राहुल धोटे आणि विजय वडस्कर यांनी केली.

कारऐवजी पाठवले ३.५० लाख रुपयांचे सामाननंदनकर यांचा विश्वास बसावा म्हणून आरोपी कधी लॅपटॉप तर कधी टीव्ही पाठवत राहिले. नंदनकर त्यांच्या आमिषाला बळी पडले. सांगितलेल्या वेळेत इलेक्ट्रॉनिक उपकरण मिळाल्याने त्यांचा विश्वास आरोपींवर वाढला. जवळपास ३.५० लाख रुपयांचे उपकरण आरोपींनी नंदनकर यांना पाठविले, मात्र त्यांना कार मिळाली नाही.

तीन दिवसांची पोलीस कोठडीआरोपींनी लोकांना गंडा घालण्यासाठी पूर्ण कॉल सेंटरचा सेटअप तयार केला होता. येथे तरुणांना कामावर ठेवून लोकांना फोनवर विविध प्रकारचे आमिष दाखवून लुबाडण्यात येत होते. या कॉल सेंटरचा मालक फरार आहे. प्रतापनगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सूर्यप्रकाशला न्यायालयात हजर करून तीन दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा