शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

नागपुरात  एलईडीच्या नावावर कोट्यवधीचा चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 15:25 IST

ऊर्जा बचतीच्या नावावर विद्युत विभागातर्फे तयार करण्यात येणाऱ्या योजना आता महापालिका प्रशासनावर भारी पडू लागल्या आहेत. चार वर्षांपूर्वी जे.के. सोल्युशन्स इंक या कंपनीला शहरातील २६ हजार ७१२ पथदिवे बदलून एलईडी लाईट लावण्याचा कंत्राट देण्यात आला होता. मात्र, कंपनीने फक्त ५६५ पथदिवेच बदलले आहेत. या कंपनीकडे पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचेही काम होते. पण कंपनीने तेही नीट केले नाही. असे असतानाही कंपनीने महापालिकेकडे १७ कोटींची थकबाकी काढली होती. शेवटी महापालिकेला संबंधित कंपनीला १०.१५ कोटी रुपये द्यावे लागले आहेत.

ठळक मुद्दे २६ हजार ७१२ पैकी फक्त ५६५ पथदिव्यांवरच लागले एलईडीमनपाला कंपनीशी करावी लागली तडजोड

लोकमत न्यूज नेट्वर्क नागपूर : ऊर्जा बचतीच्या नावावर विद्युत विभागातर्फे तयार करण्यात येणाऱ्या योजना आता महापालिका प्रशासनावर भारी पडू लागल्या आहेत. चार वर्षांपूर्वी जे.के. सोल्युशन्स इंक या कंपनीला शहरातील २६ हजार ७१२ पथदिवे बदलून एलईडी लाईट लावण्याचा कंत्राट देण्यात आला होता. मात्र, कंपनीने फक्त ५६५ पथदिवेच बदलले आहेत. या कंपनीकडे पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीचेही काम होते. पण कंपनीने तेही नीट केले नाही. असे असतानाही कंपनीने महापालिकेकडे १७ कोटींची थकबाकी काढली होती. शेवटी महापालिकेला संबंधित कंपनीला १०.१५ कोटी रुपये द्यावे लागले आहेत.प्राप्त माहितीनुसार एलईडी लावल्यानंतर होणाऱ्या वीज बचतीमधून देखभाल दुरुस्तीचा खर्च होणार होता. मात्र, कंपनीने हे काम केलेच नाही. विद्युत विभागाने झोननिहाय प्रस्ताव तयार केला होता. त्यात त्रुटी होत्या. याचा आधार घेत संबंधित कंपनी आर्बिटेशनमध्ये गेली व महापालिकेला त्याचा कोट्यवधीचा फटका सहन करावा लागला. करार रद्द करण्याच्या स्थितीत महापालिकेवर आर्थिक नुकसान भरपाईचा दावा करण्यात आला. महापालिकेने दोन चेक दिले होते. मात्र, त्यानंतर ५.४० कोटींचा तिसरा व २.९० कोटींचा चौथा चेक तत्काळ द्यावा लागला. एलईडी स्ट्रीट लाईटच्या खरेदीवर १.२९ कोटी खर्च करण्यात आले. त्यावर १२.९५ टक्के दराने व्याज द्यायचे आहे. संबंधित रक्कम ४० दिवसात दिली नाही तर महापालिकेवर १२ टक्के व्याज अर्थात २१.६८ लाख रुपये अतिरिक्त आकारले जातील.अमरावती रोडवरील कंट्रोल रूमचे दोन कोटी रुपये महापालिकेवर काढण्यात आले होते. कंपनीने एकूण १७ कोटींची थकबाकी महापालिकेवर काढली. विद्युत विभागाच्या करारात ठेवण्यात आलेल्या त्रुटींमुळे हा भार महापालिकेवर पडला आहे.सात दिवसात द्यावी लागेल रक्कम एका कंपनीला देण्यात आलेल्या कामाची स्थिती पाहून लाईट देखभाल दुरुस्तीचे काम झोन आधारवर देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विद्युत विभागातील सूत्रानुसार कंत्राटदाराने बिल सादर करताच ते सात दिवसाच्या आत देण्याची करारात तरतूद आहे. यात विलंब झाला तर महापालिकेवर दंड बसतो. विशेष म्हणजे वित्त विभागाच्या मंजुरीशिवाय संबंधित कामासाठी विद्युत विभागाने एस्क्रो अकाऊंट उघडले आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर