शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात शासकीय मालमत्तावर कोट्यवधींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 21:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेचे मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी प्रशासन कामाला लागले आहे. परंतु यात अपेक्षित यश मिळत नसल्याचे चित्र आहे. शासकीय कार्यालयांकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ताकर थकीत आहे. यात केंद्र व राज्य सरकारच्या विविध कार्यालयाकडे २४.२५ कोटींची थकबाकी असून यातील १०.७७ कोटींची वसुली करण्यात कर संकलन विभागाला ...

ठळक मुद्देमहापालिके चे आर्थिक नुकसान : ३१ मार्चपर्यंत वसुलीचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेचे मुख्य आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी प्रशासन कामाला लागले आहे. परंतु यात अपेक्षित यश मिळत नसल्याचे चित्र आहे. शासकीय कार्यालयांकडे मोठ्या प्रमाणात मालमत्ताकर थकीत आहे. यात केंद्र व राज्य सरकारच्या विविध कार्यालयाकडे २४.२५ कोटींची थकबाकी असून यातील १०.७७ कोटींची वसुली करण्यात कर संकलन विभागाला यश आले आहे. शासकीय कार्यालयाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे.स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी वर्ष २०१७-१८ या वर्षाचा २२७१.९७ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. यात मालमत्ताकरापासून ३९२.१९ कोटींचे उत्पन्न अपेक्षित होते. परंतु शुक्रवारपर्यत मालमत्ताकरापासून १४९ कोटींची वसुली झाली. सध्याची परिस्थिती विचारात घेता ३१ मार्चपूर्वी २२० ते २३० कोटींचीही वसुली अवघड असल्याचे चित्र आहे. मालमत्ता सर्वेक्षण अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे केवळ २ लाखांच्या आसपास डिमांड जारी करण्यात आलेल्या आहेत. ४२ टक्के मालमत्ताचे सर्वेक्षण शिल्लक आहे. सर्वेक्षण झाले नसल्याने ३१ मार्चपूर्वी सर्व डिमांडचे वाटप अशक्य आहे. मात्र पुढील वर्षात सर्वेक्षणासोबतच कर वसुली आॅनलाईन केल्यास विद्यमान वसुलीच्या लक्ष्यापर्यंत पोहचायला मदत होणार आहे. महापालिका क्षेत्रातील केंद्र व राज्य शासनाच्या ४० टक्के कार्यालयांनी कर भरलेला नाही. यामुळे महापालिकेला आर्थिक फटका बसला आहे.९१२५ आक्षेप नोंदविलेमालमत्ता करात प्रचंड वाढ झाल्याचा नगरसेवकांनी आरोप केला होता. यावर चर्चा करण्यासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. सोबतच आक्षेप नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. यात मालमत्ता कर विभागाकडे ९१२५ आक्षेप नोंदविण्यात आले. वास्तविक महापालिके च्या रेकॉर्डनुसार शहरात ५.३६ लाख मालमत्ता आहेत. सायबरटेक कंपनीने ३.८३ लाख मालमत्तांचा सर्वे केला आहे. यातील २.५९ लाख मालमत्तांचा डाटा अपलोड करण्यात आला आहे. ७२ हजार नवीन मालमत्ता आढळून आलेल्या आहेत. यातून आक्षेप नोंदविणाऱ्यांचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते.

टॅग्स :TaxकरNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका