शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात साक्षीदारावर गुंडाचा प्राणघातक हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 19:39 IST

कोर्टात साक्ष दिली म्हणून एका कुख्यात गुन्हेगाराने आपल्या भावाच्या मदतीने साक्षीदारावर प्राणघातक हल्ला चढवून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सोमवारी मध्यरात्रीनंतर सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही थरारक घटना घडली.

ठळक मुद्देकुख्यात पठाण बंधूंचा हैदोस : एकाला अटक, दुसरा फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोर्टात साक्ष दिली म्हणून एका कुख्यात गुन्हेगाराने आपल्या भावाच्या मदतीने साक्षीदारावर प्राणघातक हल्ला चढवून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सोमवारी मध्यरात्रीनंतर सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही थरारक घटना घडली. राजा पठाण (वय ३५) आणि त्याचा भाऊ शकिल पठाण (वय ३६) अशी आरोपींची नावे आहेत. ते मंगळवारी गोवा कॉलनीत उड्डाण पुलाखाली राहतात.राजेश वर्मा (वय ३४) हा हॉटेलमध्ये काम करतो. तो सदरमध्ये राहतो. आरोपी राजा पठाण हा कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध मोक्काची कारवाई झाली आहे. एका गुन्ह्यात वर्माने राजा पठाणच्या विरोधात कोर्टात साक्ष दिली. त्यामुळे तो वर्माचा राग धरून होता. त्यावेळी त्याने वर्माला धडा शिकविण्याची धमकीही दिली होती. नेहमीप्रमाणे वर्मा दाम्पत्य सोमवारी रात्री जेवण केल्यानंतर झोपी गेले असता मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी राजा आणि शकील रॉड तसेच शस्त्र घेऊन वर्माच्या घरी पोहचले. त्यांनी दारावर लाथा मारून वर्मा दाम्पत्याला दार उघडण्यास बाध्य केले. दार उघडताच आरोपींनी वर्माला तू कोर्टात साक्ष का दिली, अशी विचारणा करून शिवीगाळ केली. त्यानंतर त्याच्या डोळ्यात मिरची पावडर झोकून डोक्यावर जोरदार फटके हाणले. रक्ताच्या थारोळ्यात लोळलेल्या पतीची मदत करण्यासाठी सोनू वर्मा (वय ३२) धावली असता आरोपींनी तिलाही शिवीगाळ करून धमकी दिली. वर्मा दाम्पत्याची आरडाओरड ऐकून शेजारी गोळा झाले. ते पाहून आरोपी पळून गेले. जखमी वर्माला मेयोत दाखल करण्यात आले. माहिती कळताच सदर पोलीस घटनास्थळी पोहचले. तेथून ते रुग्णालयात गेले. सोनू वर्माच्या तक्रारीवरून आरोपी राजा आणि शकिल पठाणविरुद्ध कलम ३०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी धावपळ करून आरोपी शकिलला अटक केली. राजा पठाणचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक