शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

सेवाग्रामच्या ऐतिहासिक बैठकीसाठी नागपूर कॉंग्रेस सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 23:13 IST

गांधी जयंतीच्या मुहूर्तावर सेवाग्राम येथे होत असलेल्या कॉंग्रेसच्या अखिल भारतीय कार्यकारी समितीच्या बैठकीसाठी नागपूर कॉंग्रेस कमिटी सज्ज झाली आहे. शुक्रवारप्रमाणे शनिवारीदेखील नियोजनासंदर्भात विविध पातळ्यांवर बैठका चालल्या. या बैठकांचा आढावा व संपूर्ण नियोजन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना रविवारी सादर करण्यात येणार आहे. नागपुरातून सेवाग्रामसाठी १० हजारांहून अधिक कार्यकर्ते रवाना होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देनियोजनासाठी बैठकांचा जोर : नागपुरातून १० हजारांहून अधिक कार्यकर्ते जाणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गांधी जयंतीच्या मुहूर्तावर सेवाग्राम येथे होत असलेल्या कॉंग्रेसच्या अखिल भारतीय कार्यकारी समितीच्या बैठकीसाठी नागपूर कॉंग्रेस कमिटी सज्ज झाली आहे. शुक्रवारप्रमाणे शनिवारीदेखील नियोजनासंदर्भात विविध पातळ्यांवर बैठका चालल्या. या बैठकांचा आढावा व संपूर्ण नियोजन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना रविवारी सादर करण्यात येणार आहे. नागपुरातून सेवाग्रामसाठी १० हजारांहून अधिक कार्यकर्ते रवाना होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.सेवाग्राम येथील बैठक व सभा ‘न भूतो न भविष्यति’ अशी व्हावी यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीसह नागपूर शहरातील पदाधिकाऱ्यांनीदेखील कंबर कसली आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने नियोजनाबाबत बैठकांचे सत्र सुरू आहे. शनिवारी याबाबत नागपूर शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली देवडिया भवन येथे बैठक झाली. या बैठकीत शहरातील एकूण तयारीचा आढावा घेण्यात आला. कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांच्यापासून सर्व कॉंग्रेसच्या नेत्यांचे नागपूर विमानतळावर स्वागत करण्यापासून प्रत्येक लहानसहान बाबीची तयारी करण्यात आली आहे. याची जबाबदारी विविध पदाधिकाऱ्यांना सोपविण्यात आली.सेवाग्राम येथे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात होणारी पदयात्रा व जाहीर सभेसाठी नागपुरातून १० हजारांहून अधिक कॉंग्रेस कार्यकर्ते जाणार आहेत. शहरात कॉंग्रेसचे १८ ‘ब्लॉक’ असून प्रत्येक ठिकाणाहून किती कार्यकर्ते येतील याची यादीच तयार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.बैठकीमध्ये प्रत्येक पदाधिकाऱ्यावर नेमकी कुठली जबाबदारी असेल, कोण किती कार्यकर्त्यांचे नियोजन करेल, इत्यादी जबाबदाऱ्यादेखील ठरविण्यात आल्या. बैठकीला माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, प्रदेश सचिव अतुल कोटेचा, नाना गावंडे, अ‍ॅड.अभिजित वंजारी, उपाध्यक्ष प्रा.दिनेश बानाबाकोडे, बंडोपंत टेंभुर्णे, सरचिटणीस जयंत लुटे, महिला अध्यक्षा प्रज्ञा बडवाईक प्रामुख्याने उपस्थित होते.राहुल, सोनिया गांधी यांचे २ आॅक्टोबरला आगमनदरम्यान, कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांचे नागपुरात २ आॅक्टोबर रोजी आगमन होईल. नवी दिल्लीहून ते नागपूर विमानतळावर सकाळी ११.३० वाजता पोहोचतील व थेट सेवाग्रामकडे रवाना होतील. त्यानंतर सेवाग्राम येथे प्रथम कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीची बैठक पार पडेल. त्यानंतर पदयात्रा होईल व अखेर सेवाग्राम येथेच जाहीर सभा होणार आहे. अ.भा.काँग्रेस कमेटीचे महासचिव मल्लिकार्जुन खरगे हे १ आॅक्टोबर रोजीच नागपुरात दाखल होतील.व्हेरायटी चौकात एकत्र येणार शहर पदाधिकारी२ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त शहरातील कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी व्हेरायटी चौक येथे सकाळी ८ वाजता एकत्र येतील. येथे महात्मा गांधी यांना आदरांजली अर्पण करण्यात येईल व त्यानंतर १० वाजता सर्व जण कार्यकर्त्यांसह सेवाग्रामसाठी रवाना होतील, असे नियोजन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेसSewagramसेवाग्राम