शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहर काँग्रेसचा आज पुन्हा दिल्लीत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 23:32 IST

काही दिवसांपूर्वी माजी खासदार विलास मुत्तेमवार व शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या गटाने दिल्लीवारी करीत लोकसभा निवडणुकीच्या तिकिटावर दावा केल्यानंतर विरोधी गटाने दिल्ली गाठण्याची तयारी केली. महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्वात शंभराहून अधिक कार्यकर्ते सोमवारी राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीला रवाना झाले. याची कुणकुण लागताच ठाकरे गट विमानाने मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा दिल्लीत दाखल होत असल्याने नागपूरकरांना काँग्रेसचा दिल्लीतील गोंधळ बघायला मिळणार आहे.

ठळक मुद्देवनवे गट रात्रीच्या रेल्वेने तर ठाकरे समर्थकांसह विमानाने दिल्लीला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काही दिवसांपूर्वी माजी खासदार विलास मुत्तेमवार व शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या गटाने दिल्लीवारी करीत लोकसभा निवडणुकीच्या तिकिटावर दावा केल्यानंतर विरोधी गटाने दिल्ली गाठण्याची तयारी केली. महापालिकेतील विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्या नेतृत्वात शंभराहून अधिक कार्यकर्ते सोमवारी राजधानी एक्स्प्रेसने दिल्लीला रवाना झाले. याची कुणकुण लागताच ठाकरे गट विमानाने मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा दिल्लीत दाखल होत असल्याने नागपूरकरांना काँग्रेसचा दिल्लीतील गोंधळ बघायला मिळणार आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाने दिल्ली गाठून महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व ए. के.अ‍ॅन्थोनी, अहमद पटेल, मोतीलाल व्होरा व मुकुल वासनिक आदींच्या भेटी घेऊन नागपूर लोकसभा मतदार संघातील पक्षाचा उमेदवार शहर काँगे्रस कमिटीच्या मताने ठरविला जावा, गेल्या पाच वर्षांत पक्षाकडे पाठ फिरविणाऱ्यांना उमेदवारी देऊ नये, अशी भूमिका मांडली होती.दरम्यान, वनवे गटाने आमदार निवासात बैठक घेऊ न नागपूर लोकसभा मतदार संघात काँग्रेसची उमेदवारी माजी मंत्री नितीन राऊ त, सतीश चतुर्वेदी, प्रफुल्ल गुडधे, माजी खासदार गेव्ह आवारी वा माजी आमदार अशोक धवड यांना देण्यात यावी. बडतर्फ सतीश चतुर्वेदी यांना पुन्हा काँग्रेस पक्षात घेण्यात यावे, अशा आशयाचा ठराव या बैठकीत पारित करण्यात आला होता.काँग्रेसच्या नवनियुक्त महासचिव प्रियंका गांधी यांचे अभिनंदन करण्यासाठी दिल्लीला जात असल्याचे तानाजी वनवे यांनी सांगितले. त्यांच्यासोबत कमलेश चौधरी, विजय बाभरे, यशंवत कुंभलकर, किशोर जिचकार, आयशाअन्सारी,मनोज गावंडे, जुल्फीकार भुट्टो यांच्यासह दीडशे कार्यकर्ते दिल्लीला निघाले आहेत.दरम्यान, नितीन राऊत, गेव्व्ह आवारी, अशोक धवड आधीच दिल्लीत दाखल झालेले आहेत. सतीश चतुर्वेदी दिल्लीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, नितीन राऊ त यांनी कार्यकर्ते दिल्लीत येत असल्याबाबत कल्पना नसल्याचे सांगितले. अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष असल्याने देशभरातील जबाबदारी आहे. तूर्त नागपूर जिल्ह्यातील राजकारणापासून दूर आहे. परंतु रामटेक लोकसभा मतदार संघात राऊ त यांना उमेदवारी देण्याची मागणी त्यांच्या समर्थकांनी केली होती.विकास ठाकरे यांच्यासह अ‍ॅड. अभिजित वंजारी, अतुल लोंढे, उमकांत अग्निहोत्री, प्रशांत धवड, संदीप सहारे, मनोज सांगोळे, धरम पाटील ठाकरे गटातील १४ नगरसेवक यांच्यासह ९० हून अधिक पदाधिकारी मंगळवारी सकाळी दिल्लीला विमानाने रवाना होत आहेत. यात गेल्यावेळी गेलेल्या पदाधिकाऱ्यांसह नवीन पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती विकास ठाकरे यांनी दिली. दोन्ही गट दिल्लीत डेरेदाखल होत असल्याने गोंधळ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण