शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर शहर बस कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीत घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:45 IST

भविष्य निर्वाह निधी हा कामगारांचा भविष्याचा आधार असतो. कामगारांचा भविष्य निर्वाह निधी जमा करणे आवश्यक आहे. परंतु महापालिके च्या आपली बस सेवेचे संचालन करणाऱ्या ट्रॅव्हल्स टाइम कंपनीने नियमानुसार कामगारांच्या वेतनातून कपात करून व तितकीच रक्क्म कंपनीकडून जमा करणे अपेक्षित आहे. मात्र कंपनीकडून कामगारांच्या खात्यात महिन्याला फक्त १६८ रुपये जमा केले जातात. यात कोट्यवधीचा घोटाळा असल्याच्या आरोप भारतीय कामगार सेनेने केला आहे.

ठळक मुद्देभारतीय कामगार सेनेचा आरोप : आयुक्त अनिमेष मिश्रा यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भविष्य निर्वाह निधी हा कामगारांचा भविष्याचा आधार असतो. कामगारांचा भविष्य निर्वाह निधी जमा करणे आवश्यक आहे. परंतु महापालिके च्या आपली बस सेवेचे संचालन करणाऱ्या ट्रॅव्हल्स टाइम कंपनीने नियमानुसार कामगारांच्या वेतनातून कपात करून व तितकीच रक्क्म कंपनीकडून जमा करणे अपेक्षित आहे. मात्र कंपनीकडून कामगारांच्या खात्यात महिन्याला फक्त १६८ रुपये जमा केले जातात. यात कोट्यवधीचा घोटाळा असल्याच्या आरोप भारतीय कामगार सेनेने केला आहे.संघटनेच्या शिष्टमंडळाने बुधवारी भविष्य निर्वाह निधी विभागाचे आयुक्त अनिमेष मिश्रा यांना निवेदन दिले. यात संघटनेचे जिल्हा संघटक बंडू तळवेकर, संघटनेचे अध्यक्ष भाऊ राव रेवतकर, सचिव अंबादास शेंडे, मनोज कारोकार व विशाल राऊ त यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.ट्रॅव्हल्स टाइम कंपनीत ३२० कामगार आहेत. कामगारांच्या वेतनातून दर महिन्याला १२ टक्के ईपीएफ कपात करून व तितकीच रक्कम कंपनीने जमा करणे अपेक्षित आहे. त्यानुसार दर महिन्याला प्रत्येक कर्मचाऱ्याच्या वेतनातून ११३९ रुपये कपात होेणे अपेक्षित आहे. परंतु प्रत्येक कामगाराचे महिन्याला १६८ रुपये जमा केले जातात. म्हणजेच एका कामगारामागे महिन्याला १९२६ रुपयांचा घोटाळा केला जात आहे. अशाप्रकारे ३२० कामगारांचे महिन्याला ६ लाख १६ हजार ३२० रुपये होतात. गेल्या सहा महिन्यात कंपनीने ३६ लाख ९७ हजार ९२० रुपयांचा घोटाळा केला आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त व परिवहन व्यवस्थापकांना माहिती दिल्यानंतरही कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही केलेली नाही. तसेच कंपनीने ईएसआयची रक्कम न भरल्याने कामगारांना उपचार मिळत नसल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणले. दरम्यान कंपनीच्या विरोधात बेलतरोडी पोलिसात तक्रार देण्यात आल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus Driverबसचालक